esakal | गणेशमूर्ती शिल्लकचे प्रमाण नगण्य
sakal

बोलून बातमी शोधा

kolhapur

गणेशमूर्ती शिल्लकचे प्रमाण नगण्य

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

इचलकरंजी : संकटाच्या कोंडीत सापडलेल्या कुंभारांच्या चेहऱ्यावर यंदा हसू उमटले. बाप्पाच्या आगमनासाठी नागरिकांचा असणाऱ्या उत्साहाची मूर्तिकारांच्या उत्साहात भर पडली. या वर्षी गणेशमूर्ती शिल्लक राहण्याचे प्रमाण नगण्य राहिले असून मंडळाच्या मूर्तींचा तुडवडा जाणवला. गतवर्षीचा फटका सहन करत उमेदीने केलेले यंदा अचूक नियोजन मूर्तिकारांना लाभदायक ठरले आहे.

शहरातील कुंभार बांधवांनी दरवर्षीच्या तुलनेत कमी प्रमाणात गणेशमूर्ती तयार करूनही गेल्यावर्षी ३० टक्के मूर्ती शिल्लक राहिल्या. आठ इंचांपासून एक फुटापर्यंत घरगुती गणेशमूर्तींना सर्वाधिक मागणी राहिली.

हेही वाचा: कोल्हापुरात पावसाचा जोर कायम; मौनी सागर जलाशय 100 टक्के भरला

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतनंतरही या वर्षी गणेशोत्सवावर गतवर्षीसारखे संकट ओढवेल, अशी भीती मूर्तिकारांना लागलेली होती. मागणी आणि परिस्थिती याचा सारासार विचार करून उमेदीने कुंभार कामाला लागले. एक ते सव्वा फुटावर भर देत चार फुटांपर्यंत गणेशमूर्ती तयार केल्या. हात थोडा आखडताच ठेवत कामाला गती दिली.

या वर्षी गणेशोत्सवात नागरिकांचा अमाप उत्साह पाहायला मिळाला. शहरात मंडळांचीही संख्या वाढल्याने अखेरपर्यंत मागणी वाढत होती. मात्र अचानक वाढलेल्या मागणीची पूर्तता करताना कुंभारांना घाम फुटला. उत्साहाने पेटून उठलेल्या गणेशोत्सवाने मूर्तिकारांच्या जीवनात समाधान आणले. गतवर्षीच्या संकटाची मोठी धास्ती मूर्तिकारांमध्ये होती. या धास्तीचा सामना करत गणेशोत्सवात मूर्तिकारांनी आनंद आणला. तयार केलेल्या व खरेदी केलेल्या गणेशमूर्तीची उत्तम विक्री झाल्याने मूर्तिकार, व्यापाऱ्यांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.

loading image
go to top