Nandani Math Elephant : महाराष्ट्र, कर्नाटकातील जैन समाजाच्या ७४८ गावात प्रिय असणारा नांदणी मठाचा हत्ती जाणार अंबानींच्या जंगलात, काय आहे कारण?

Nandani Math News : वनविभागाची परवानगी न घेता मिरवणुकीत या हात्तीणीला सहभागी केल्याचा आरोप प्राणी हक्कासाठी लढणाऱ्या ‘पेटा’ संघटनेने केला होता.
Nandani Math Elephant
Nandani Math Elephantesakal
Updated on

Nandani Elephant Transfer To Ambani Forest : नांदणी (ता. शिरोळ) येथील प. पू. स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थान मठातील महादेवी हत्तीणीला दोन आठवड्यांत गुजरातच्या जामनगरमधील राधेकृष्ण मंदिर हत्ती कल्याण ट्रस्टच्या विशेष हत्ती कल्याण केंद्रात पाठविण्याचे सूचित करण्यात आले होते. मात्र, मठ संस्थानने सुप्रीम कोर्टात धाव घेऊन हात्तीण नांदणी मठाकडे राहण्यासाठी सोमवारी (ता. २१) याचिका दाखल केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com