

गोव्याला फिरायला गेले अन् बंद बंगला फोडून साडेतेरा तोळे दागिने पळविले
esakal
Gadhinglaj Crime News : डहिंग्लज येथील शेंद्री रस्त्यावरील बंद असलेल्या ‘आठवण’ बंगल्याचा कडी-कोयंडा उचकटून चोरट्यांनी एक किलो चांदीच्या मूर्ती, साडेतेरा तोळे सोन्याचे दागिने व रोख ३० हजारांवर डल्ला मारला. गुरुवारी (ता. २३) मध्यरात्रीच्या सुमारास हा प्रकार घडला. पोलिसांनी चांदी व सोन्याची किंमत १२ लाख २० हजार इतकी नोंदविली असून, बाजारभावानुसार त्याची किमत १७ लाखांवर जाते.