
Tirupati Devasthanam Balaji
esakal
मानाचा शालू अर्पण – तिरुमला तिरुपती देवस्थानकडून नवरात्रोत्सवाच्या परंपरेनुसार करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीला १ लाख ६६ हजार १०० रुपयांचा शालू अर्पण करण्यात आला.
पूजन व अर्पण विधी – गुलाबी काठ असलेला पिस्ता रंगाचा शालू पूजन करून चेअरमन बी. आर. नायडू यांच्या हस्ते देवीला अर्पण करण्यात आला; जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी तो स्वीकारला.
मान्यवरांची उपस्थिती – खासदार श्रीकांत शिंदे, खासदार धैर्यशील माने, तसेच तिरुमला देवस्थानचे पदाधिकारी व स्थानिक अधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते.
Ambabai Saree Offering : तिरुमला देवस्थानकडून करवीर निवासिनी श्री अंबाबाईला आज मानाचा शालू अर्पण करण्यात आला. या शालूची किंमत तब्बल एक लाख ६६ हजार १०० रुपये इतकी आहे. तिरुमला तिरुपती देवस्थानचे चेअरमन बी. आर. नायडू यांच्या हस्ते देवीला शालू अर्पण करण्यात आला. हा शालू जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी स्वीकारला.