dhairyashil mane
dhairyashil mane sakal

कलाविष्कारातून जीवनात आनंद : खासदार धैर्यशील माने

माने इन्स्टिट्यूशनमध्ये आर्ट गॅलरीचे उद्‍घाटन

पेठवडगाव : कोणते ना कोणते कलागुण प्रत्येकाच्या अंगी असतात. निस्सीम श्रद्धा असेल, तर कला विकसित होते. कलाविष्काराच्या माध्यमातून जीवनात आनंद निर्माण होतोच, तसेच कलेतील नैपुण्याची वाहवा निश्चितपणे होते. संवेदनशील वृत्तीतून कला सहजपणे रेखाटता येते व्यक्त होते ती नजरेत भरून वास्तवता उभी करते. त्यामुळे कलेची आवड जोपासून आनंद द्या अन्‌ आनंद घ्या, असे आवाहन खासदार धैर्यशील माने यांनी केले.

वाठार तर्फ वडगाव येथील अशोकराव माने ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशनमध्ये आर्ट गॅलरीच्या उद्‍घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा बँकेचे संचालक, संस्थाध्यक्ष विजयसिंह माने होते. जिल्हा परिषद सदस्या मनीषा माने प्रमुख उपस्थित होत्या. विजयसिंह माने म्हणाले, ‘चौकस वृत्ती अधिक सजग बनविते. दृष्टिकोन व्यापक होऊन कला प्रभावीवणे रेखाटता येते. त्यातून समाजात विधायक संदेश जातो. साहजिकच कलेतून लक्षवेधी प्रबोधन होते. कला जीवन जगण्याच्या दिशा सुकर करते.’

रांगोळी, मेहंदी, कार्टुन, निसर्ग चित्र, व्यक्ती चित्र अशा विविध कलाकृतींनी उपस्थितांची वाहवा मिळवली. संचालक एच. टी. जाधव, प्रवीण घेवारी, प्रा. अरविंद कार्वेकर, सीमा पाटील, संगीता शेटे, जे. एम. शिंदे, प्राचार्य युवराज गुरव आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com