Board Exam
Board Examesakal

12th Exam : इचलकरंजीत 11 केंद्रांवर बारावी परीक्षा; परीक्षार्थींची संख्या 460 ने वाढली

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे बारावी परीक्षा बुधवारपासून (ता.२१) पासून सुरू होत आहेत.
Summary

कॉपीला आळा घालण्यासाठी माध्यमनिहाय व विषयानुसार विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था बदलती ठेवण्यात येणार आहे.

इचलकरंजी : माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे बारावी परीक्षा बुधवारपासून (ता.२१) पासून सुरू होत आहेत. इचलकरंजीसह परिसरातील ११ केंद्रांवर परीक्षेचे नियोजन केले आहे. यावर्षी परीक्षार्थींच्या संख्येत ४६० ने भर पडली आहे. वाढीव ५ टक्के विद्यार्थ्यांची सोय करत यावर्षी दि न्यू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज हे केंद्र वाढवले आहे.

इचलकरंजी विभागातून कला, वाणिज्य, शास्त्र आणि किमान कौशल्य शाखेचे ९ हजार २२२ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत, अशी माहिती इचलकरंजी कस्टडीप्रमुख शिवाजी बोरचाटे यांनी दिली. शहर व परिसरातील परीक्षा केंद्रे म्हणून उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालये निश्चित केली आहेत. तालुका शिक्षण मंडळ कार्यालयातून गोविंदराव हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज हे परिरक्षक कार्यालय (कस्टडी) आहे. नवीन बदलांसह यंदाही विद्यार्थी परीक्षेला सामोरे जात आहेत.

Board Exam
राज्यातील प्रकल्पांसाठी 'टाटा' गुंतवणार तब्बल 2300 कोटी; सरकारशी करार, 1600 जणांना मिळणार रोजगार

कॉपीला आळा घालण्यासाठी माध्यमनिहाय व विषयानुसार विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था बदलती ठेवण्यात येणार आहे. प्रत्येक दिवशी विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था वेगळ्या ठिकाणी होईल. एक शाखा एक परीक्षा केंद्र बदलून प्रत्येक केंद्रावर कला, वाणिज्य, शास्त्र आणि किमान कौशल्य शाखेची बैठक व्यवस्था केली आहे. त्यामुळे कॉपीमुक्त, गैरमार्गाला आळा बसणार आहे. तसेच कॉपीमुक्त परीक्षेसाठी बैठी पथकासह महसूल, पोलिस यासह इतर खाते पथकांचीही नजर असणार आहे.

निर्धारित वेळेनंतर दहा मिनिटांचा कालावधी विद्यार्थ्यांना वाढवून देण्याचा निर्णय यंदाही कायम केला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिका लिहण्यास १० मिनिटे अधिक वेळ मिळणार आहे. परीक्षेच्या वेळेतही बदल तसाच राहील. प्रश्नपत्रिकेचे परीक्षा कक्षात वाटप निर्धारित वेळेत होणार आहे. सहायक परिरक्षकांच्या जबाबदारीखाली प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका वितरणाचे जीपीएस ट्रॅकिंग होणार आहे.

Board Exam
Jyotiba Dongar : जोतिबा डोंगरावरील 67 लाखांचा सौरऊर्जा प्रकल्प रेंगाळला; ग्रामस्थांसह भाविकांतून तीव्र नाराजी

गर्ल्स हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, गंगामाई गर्ल्स हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, डीकेएएससी महाविद्यालय, संभाजीराव माने गर्ल्स हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज रुकडी, शांताराम दातार ज्युनिअर कॉलेज हुपरी, अण्णासाहेब डांगे कॉलेज ज्युनिअर कॉलेज हातकणंगले, श्री बालाजी माध्यमिक विद्यालय अँड जुनिअर कॉलेज, तात्यासाहेब मुसळे विद्यालय अँड ज्युनिअर कॉलेज, शरद सायन्स अँड कॉमर्स कॉलेज यड्राव, दि न्यू हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ही केंद्रे परीक्षेसाठी सज्ज आहेत.

हे नियम बंधनकारक

  • * परीक्षा केंद्रावर मुलांना बाकापर्यंत पिण्याचे पाणी नाही

  • * पिण्यासाठी पाण्याची सोय केंद्राबाहेर व्हराड्यांत

  • * परीक्षा काळात केंद्राबाहेर झेरॉक्स दुकाने बंद राहतील

  • *परीक्षा केंद्राच्या ५० मीटरच्या आत अनधिकृत व्यक्तींना प्रवेश नाही

  • *शिक्षकांना स्मार्ट वॉच वापरण्यास परवानगी नाही

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com