विद्यापीठात अण्णा भाऊ साठे जयंतीनिमित्त आज व्याख्यान

विद्यापीठात अण्णा भाऊ साठे जयंतीनिमित्त आज व्याख्यान

अण्णा भाऊ साठे जयंतीनिमित्त
विद्यापीठात आजपासून कार्यक्रम
कोल्हापूर ः शिवाजी विद्यापीठातील अण्णा भाऊ साठे अध्यासनातर्फे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंतीनिमित्त मंगळवारी (ता. १) आणि बुधवारी (ता. २) विविध कार्यक्रम होतील. मंगळवारी सकाळी साडेदहाला मुख्य इमारतीत कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले जाईल. अकराला डॉ. बाबूराव गुरव (तासगाव) यांचे ‘अण्णा भाऊ साठे यांचे वाङ्मय आणि विचारविश्व’ विषयावर व्याख्यान आहे. शाहीर रणजित आशा, अंबाजी कांबळे आणि सहकाऱ्यांचा प्रबोधनपर शाहिरी सादरीकरण कार्यक्रम होईल. बुधवारी सकाळी अकराला ‘अण्णा भाऊ साठे यांचे वाङ्मय : पुनर्शोधाच्या दिशा’ विषयावर परिसंवाद होईल. अध्यक्ष म्हणून कवी अजय कांडर (कणकवली) तर, सोमनाथ कदम (सावंतवाडी), सुनीता बोर्डे (सांगली), प्रकाश नाईक (सरुड), निरंजन फरांदे (सातारा) वक्ते सहभागी होतील. दोन्ही कार्यक्रम वि. स. खांडेकर भाषाभवन सभागृहात होतील, अशी माहिती अध्यासनाचे समन्वयक प्रा. डॉ. रणधीर शिंदे यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com