Kolhapur News
Kolhapur Newsesakal

घोरपडे नाट्यगृह कात टाकणार; इचलकरंजीत नूतनीकरणाचा प्रस्ताव, 2 कोटी 30 लाखांचे अंदाजपत्रक

आजही नाट्यगृहातील अनेक सुविधा कालबाह्य झाल्या आहेत.
Summary

पश्चिम महाराष्ट्रातील प्रशस्त असे नाट्यगृह आहे; पण अलीकडच्या काळात नाट्यगृहाची दुरवस्था झाली आहे.

इचलकरंजी : येथील महापालिकेच्या श्रीमंत ना. बा. घोरपडे नाट्यगृहाची दुरवस्था लवकरच दूर होणार आहे. नाट्यगृह नूतनीकरणाचा प्रस्ताव बांधकाम विभागाकडून तयार करण्यात येत आहे. त्यासाठी २ कोटी ३० लाखांचे अंदाजपत्रक तयार केले आहे. यासाठी लागणारा निधी प्राप्त होण्यासाठी शासनाकडे लवकरच प्रस्ताव पाठवण्यात येणार आहे. तो प्राप्त झाल्यानंतर पुन्हा एकदा प्रशस्त अशा या नाट्यगृहाला गतवैभव प्राप्त होणार आहे.

शहरात बंदिस्त नाट्यगृहाची वानवा होती. बहुतांशी नाट्यकृती, कलाकृती खुल्या मैदानावर होत होत्या. त्यामुळे तत्कालीन नगरपरिषदेने १९९३ मध्ये भव्य अशा वातानुकूलित नाट्यगृहाची उभारणी केली. त्यावेळी १ कोटी ९० लाखांचा खर्च आला होता. पश्चिम महाराष्ट्रातील प्रशस्त असे नाट्यगृह आहे; पण अलीकडच्या काळात नाट्यगृहाची दुरवस्था झाली आहे. अनेक गैरसोयींमुळे रसिक श्रोत्यांसह संयोजकांना त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत महापालिका प्रशासनाकडे सातत्याने तक्रारी झाल्या आहेत.

आजही नाट्यगृहातील अनेक सुविधा कालबाह्य झाल्या आहेत. त्यामुळे एकूणच नाट्यगृहाचे नूतनीकरण करण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. याबाबत महापालिकेच्या बांधकाम विभागाकडून नाट्यगृहातील विविध कामांचे अंदाजपत्रक तयार केले आहे. सुमारे २ कोटी ३० लाखांच्या खर्चाचे अंदाजपत्रक तयार केले आहे. शासनाकडे निधीसाठी प्रस्ताव सादर केला जाणार आहे.

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी इचलकरंजी दौऱ्यावेळी महापालिकेला निधीचा बूस्टर डोस तातडीने दिला जाईल, असे सांगितले आहे. त्यामुळे नाट्यगृहाच्या नूतनीकरणाच्या प्रस्तावाला तातडीने मंजुरी मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. लवकरच याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात येणार असल्याचे शहर अभियंता महेंद्र क्षीरसागर यांनी सांगितले.

नाट्यगृह दृष्टिक्षेप

एकूण क्षेत्र - ३.५ एकर
आसन क्षमता - १२००
रंगमंच - ५० बाय ६० फूट
वातानुकूलित क्षमता - १२० टन
सराव हॉल - २
मेकअप रूम - ५
कॉमन हॉल - १
गेस्ट रूम - ५
कर्मचारी संख्या - १०.

प्रस्तावित दुरुस्तीची कामे

प्रेक्षागृहातील खुर्च्या
ध्वनी व्यवस्था
१५ स्पॉट लाईट
वातानुकूलित यंत्रणा
प्रेक्षागृहातील विद्युत दिवे
मेकअप रूम
प्रसाधनगृह
नळपाणी यंत्रणा
रंगमंचावरील लाईट
शुद्ध पिण्याचे पाणी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com