Kolhapur Crime
Kolhapur Crimeesakal

नंग्या तलवारी नाचवत भरदिवसा कोल्हापुरात 60 तरुणांच्या टोळक्याची दहशत; दहा गाड्या फोडल्या, मोठा पोलिस बंदोबस्त तैनात

रुक्मिणीनगरातील एका शाळेत (School) विद्यार्थ्यांचा वाद आहे. यासाठी काही महिन्यांपूर्वी पोलिस ठाण्यापर्यंत तक्रारी झाल्या आहेत.
Summary

रात्री उशिरा शाहूपुरी पोलिसांनी कावळा नाका येथून एका सशंयित तरुणाला ताब्यात घेतले. त्याच्याकडून अन्य संशयितांची माहिती घेण्याचे काम सुरू होते.

कोल्हापूर : पूर्ववैमनस्यातून काल सायंकाळी टाकाळा परिसरातील झोपडपट्टीत तलवारी, काठ्या, कोयता घेऊन सुमारे पन्नास-साठ तरुणांच्या टोळक्याने दहशत माजवली. टोळक्याच्या दगडफेकीत टेम्पो, पाच मोटारी, चार दुचाकी अशा दहा वाहनांचे मोठे नुकसान झाले. यात एक संशयित जखमी झाला असून, त्याला पोलिसांनी रुग्णालयात दाखल केले. घटनास्थळी पोलिसांनी (Kolhapur Police) मोठा बंदोबस्त ठेवला असून, रात्री उशिरापर्यंत तणावाचे वातावरण होते.

दरम्यान, टाकाळा येथील हल्ला कावळानाका येथील तरुणांच्या गटाने केल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यामुळे राजारामपुरी पोलिस टाकाळा परिसरात तर शाहूपुरी पोलिस (Shahupuri Police) कावळा नाका परिसरात थांबून होते. रात्री उशिरापर्यंत सशंयितांची नावे मिळवून पोलिसांनी कावळा नाका परिसरात धरपकड सुरू केली होती. लहान मुलांच्या भांडणातून पुढे ही दहशत झाल्याचेही स्थानिकांनी सांगितले. रात्री उशिरापर्यंत याबाबतची नोंद करण्याचे काम सुरू असल्याचे राजारामपुरी पोलिसांनी सांगितले.

Kolhapur Crime
Satara Loksabha : भाजपनं उदयनराजेंचं तिकीट कापलं? महाजन म्हणाले, 'राजेंनी तिकीट मागण्याची गरज नाही..'

घटनास्थळावरून आणि पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी : रुक्मिणीनगरातील एका शाळेत (School) विद्यार्थ्यांचा वाद आहे. यासाठी काही महिन्यांपूर्वी पोलिस ठाण्यापर्यंत तक्रारी झाल्या आहेत. यातील काही मुले कावळानाका येथील आहेत. त्यांच्याकडून टाकाळा परिसरातील जामखांडेकर कॉलनी परिसरातील विद्यार्थ्यांना त्रास दिला जातो.

त्यामुळे परिसरातील काही तरुणांनी आज सकाळी शाळा परिसरात जाऊन तेथे विद्यार्थ्यांना आणि काळवा नाका परिसरातील तरुणांना ताकीद दिली होती. याचा राग मनात धरून दुपारी साडेचारच्या दरम्यान दिगे हॉस्पिटल परिसरातून सुमारे पन्नास-साठ तरुणांचा गट काठ्या, तलवार, काढ्या, गज, कोयता, दगड घेऊन आले. त्यांनी दिसेल त्या मोटारीवर काठ्या, कुऱ्हाड्यांनी घाव घातले. त्याने परिसरात मोठी दहशत माजवली. अनेकांनी घराची दारे बंद करून घेतली. सुमारे अर्धा तास हा प्रकार सुरू होता. घरांवर आणि गाड्यांवर दगडफेक करण्यात आली. यामुळे चौक, रिकाम्या जागेवर खेळणाऱ्या मुलांनी भीतीने घर गाठले.

Kolhapur Crime
Kolhapur Loksabha : 'शरद पवार गटाचे बडे नेते लवकरच भाजपमध्ये येणार'; महाडिकांच्या दाव्याने पश्‍चिम महाराष्ट्रात खळबळ

माहिती मिळताच राजारामपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक अनिल तनपुरे यांच्यासह फौजफाटा दाखल झाला. दंगलकाबू पथकानेही सायरन वाजवत हजेरी लावली. एका बाजूने घुसलेला जमाव उड्डाणपुलाखालून पुढे गेला. यावेळी तेथे असलेली सोडा गाड्यावरही दगडफेक करून तेथेही दहशत माजविण्यात आली. या दरम्यान, पोलिसांनी एका जखमीला पकडून रुग्णालयात दाखल केले.

रात्री उशिरापर्यंत धरपकड

रात्री उशिरा शाहूपुरी पोलिसांनी कावळा नाका येथून एका सशंयित तरुणाला ताब्यात घेतले. त्याच्याकडून अन्य संशयितांची माहिती घेण्याचे काम सुरू होते. त्यानंतर पोलिसांनी कावळानाका अग्निशमन दल केंद्र परिसरात शोधमोहीम राबविली. रात्री उशिरापर्यंत संशयितांची धरपकड सुरू होती. ताब्यात घेतलेल्यांची याची नोंद रात्री उशिरापर्यंत झालेली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

Kolhapur Crime
Kolhapur Loksabha : 'झालं गेलं विसरून लोकसभेला सहकार्य करा'; खासदार मंडलिकांचं केपींना भावनिक आवाहन

वाहतूक शाखेच्‍या कॉन्स्टेबलचे प्रसंगावधान

वाहतूक शाखेचे पोलिस कॉन्स्टेबल उत्तम मोरे कोयास्को चौकात ड्युटीवर होते. त्यांना सुमारे पन्नास-साठ तरुणांचा गट तलवार, काठ्या, कोयता घेऊन येत असल्याचे दिसले. त्यांनी तातडीने कंट्रोल रूमला आणि वाहतूक शाखेला माहिती दिली. संबंधित पोलिस ठाण्‍याला कळविण्याची विनंती केली. थोड्याच वेळात तेथे मोठ्या प्रमाणात दहशत माजवण्यास सुरुवात झाली. सामान्य वाहनधारकांना याचा त्रास होऊ नये म्हणून त्यांनी टाकाळाकडे जाणारी वाहतूक काही काळासाठी उड्डाणपुलावरून ताराराणी चौकाकडे वळली. साधारण वीस-पंचवीस मिनिटांनी पोलिसांनी स्थिती नियंत्रणात आणल्यानंतर पुन्हा वाहतूक टाकाळामार्गे वळविण्यात आली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com