Vinay Kore vs Rohit Pawar
Vinay Kore vs Rohit Pawaresakal

Warana Dairy : वारणा-पराग डेअरीचं नाव रोहित पवारांनी राजकीय हेतूनं घेतलंय; विनय कोरेंचे आरोपांना प्रत्युत्तर

कर्नाटक सरकारच्या नंदिनी (Nandini Milk) ब्रँडलासुद्धा या टेंडरमध्ये काम मिळाले आहे. इंदापूरच्या संस्थेचासुद्धा यात सहभाग आहे.
Summary

वारणा ही माझी खासगी कंपनी नाही. आम्ही दूध उत्पादकांसाठी काम करतोय. त्यामुळे त्यात मी काय चुकीचे केलेले आहे, असे मला वाटत नाही.

कोल्हापूर : ‘आश्रम शाळांना दूध पुरवठा करण्याची निविदा खुली होती. त्यात ‘वारणा’सह महानंद व अन्य दोन संस्थांचा समावेश होता. त्यात वारणा (Warana Milk) व पराग डेअरीचे नाव आमदार रोहित पवार यांनी राजकीय हेतूने घेतले आहे. त्यांच्यासारख्या माणसाने अभ्यास न करता बोलायला नको होते’, अशा शब्दांत आमदार डॉ. विनय कोरे यांनी रोहित पवार (Rohit Pawar) यांनी केलेल्या आरोपाला प्रत्युत्तर दिले.

Vinay Kore vs Rohit Pawar
कोल्हापूरच्या बदल्यात सांगली हे ठरलेलंच नव्हतं, विशाल पाटीलच काँग्रेसचे उमेदवार असतील; सतेज पाटलांनी केलं स्पष्ट

कोरे (Vinay Kore) म्हणाले,‘कर्नाटक सरकारच्या नंदिनी (Nandini Milk) ब्रँडलासुद्धा या टेंडरमध्ये काम मिळाले आहे. इंदापूरच्या संस्थेचासुद्धा यात सहभाग आहे. फक्त गैरसमज पसरवायचे या अर्थाने त्यांनी ती प्रेस घेतलेली आहे. वारणा ही माझी खासगी कंपनी नाही. आम्ही दूध उत्पादकांसाठी काम करतोय. त्यामुळे त्यात मी काय चुकीचे केलेले आहे, असे मला वाटत नाही.

Vinay Kore vs Rohit Pawar
..प्रसंगी रक्त सांडावे लागले तरी बेहत्तर, पण शक्तिपीठ महामार्ग होऊ देणार नाही; राजू शेट्टींचा गर्भित इशारा

जनसुराज्य पक्ष हा लोकसभेसाठी इच्छुक नाही. मात्र विधानसभेसाठी आम्ही गांभीर्याने विचार करीत आहोत. याचा विचार भारतीय जनता पार्टीने करावा, असा आग्रह आम्ही धरलेला आहे.’ प्रा. मंडलिक यांच्या भेटीविषयी ते म्हणाले,‘लोकसभेसंदर्भात उलटसुलट चर्चा सुरू झाल्यामुळे मंडलिक यांनी माझी भेट घेतली. मतदारसंघातील परिस्थिती देवेंद्र फडणवीस यांना सांगण्यासाठी ती भेट होती.’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com