Kolhapur Crime : कोल्हापुरात तरुणाचा पाठलाग करून धारदार शस्त्रांनी निर्घृण खून; चेहऱ्यावर, छातीवर, पाठीवर सपासप वार

हल्लेखोरांनी पोत्यातून मोठ्या प्रमाणात आणलेली हत्यारे पोलिसांना (Police) घटनास्थळी सापडली.
Kolhapur Crime
Kolhapur Crimeesakal
Summary

एडका, कोयत्याने भरलेले पोते हल्लेखोर घेऊन आले होते. अजयच्या चेहऱ्यावर, छातीवर खोलवर वार झाले. यानंतरही त्याच्या पाठीवर सपासप वार करण्यात आले.

कोल्हापूर : यादवनगरात झालेले भांडण मिटविण्यासाठी रंकाळा टॉवर (Rankala Tower) येथे बोलावून तरुणावर पाठलाग करून कोयता, एडक्याने वार करण्यात आले. या हल्ल्यात अजय ऊर्फ रावण दगडू शिंदे (वय ३५) याचा मृत्यू झाला. यादवनगरातील वर्चस्व वादातून १० ते १२ जणांच्या टोळक्याने हा हल्ला केला.

सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडलेल्या प्रकाराने एकच धावपळ उडाली. हल्लेखोरांनी पोत्यातून मोठ्या प्रमाणात आणलेली हत्यारे पोलिसांना (Police) घटनास्थळी सापडली. हल्लेखोर मोटारीतून आले होते. हल्ल्यानंतर मुख्य चौकात गर्दी झाली. त्यामुळे हल्लेखोरांनी मोटार मुख्य रस्त्यावर सोडून पलायन केले.

Kolhapur Crime
Kolhapur Crime : हुतात्मा पार्कमधील ओढ्यात शिर नसलेला मृतदेह; धडाचा पाण्यातील भाग सडलेल्या स्थितीत

याबाबत राजवाडा पोलिसांनी दिलेली माहिती अशी : अजय शिंदे (Ajay Shinde) याचे भागातील काही तरुणांसोबत भांडण झाले होते. दोन दिवसांपूर्वी त्याच्या घरावर दगडफेकीचा प्रकार घडला होता. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला वाद मिटविण्याचे या दोन्ही गटांमध्ये ठरले. आज दुपारी साडेचारच्या सुमारास रोहित शिंदेने अजयला फोन करून भांडण मिटविण्यासाठी रंकाळा टॉवर येथे बोलावले. सहाच्या सुमारास अजय शिंदे मित्र सूरज, आकाश, अतुल यांच्यासोबत रंकाळाजवळ आला.

तीन मित्रांसोबत आलेला अजय शिंदे हल्लेखोरांपैकी एकासोबत चर्चा करीत होता. याचवेळी हत्यारांसह तयारीने आलेल्या दहा ते बाराजणांनी अजयला घेरल्याचे प्रत्यक्षदर्शीने पोलिसांना सांगितले. हल्लेखोरांनी अजयवर एकापाठोपाठ वार केल्याने तो खाली कोसळला. त्याला सोडविण्याच्या प्रयत्नात आकाश माळी जखमी झाला.

Kolhapur Crime
'लिव्ह इन रिलेशन'च्या वादातून तरुणीचा खून; आई, भावासह तिघांना अटक, लाकडी दांडक्याने रात्रभर बेदम मारहाण

अजयवर सहा वर्मी घाव

एडका, कोयत्याने भरलेले पोते हल्लेखोर घेऊन आले होते. अजयच्या चेहऱ्यावर, छातीवर खोलवर वार झाले. यानंतरही त्याच्या पाठीवर सपासप वार करण्यात आले. सहा वार वर्मी बसले. त्यामुळे मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला.

प्रत्यक्षदर्शींचा थरकाप

रंकाळा तलावावर सायंकाळी फेरफटका मारण्यासाठी अनेकजण सहकुटुंब आले होते. अचानक झालेल्या हल्ल्याने एकच धावपळ उडाली. अजयसोबत आलेल्या तिघांचाही अक्षरशः थरकाप उडाला होता. हल्लेखोर पसार झाल्यानंतर अजयचे साथीदार मृतदेहाशेजारीच बसून होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com