Kolhapur Crime
Kolhapur Crime esakal

Kolhapur Crime : हुतात्मा पार्कमधील ओढ्यात शिर नसलेला मृतदेह; धडाचा पाण्यातील भाग सडलेल्या स्थितीत

मृतदेहावर केवळ अंतर्वस्त्र असून, तो सडलेल्या स्थितीत आहे.
Summary

मृताचे वय अंदाजे ४० ते ५० असून, शरीरावर केवळ अंतर्वस्त्र आहे. धडाचा पाण्यातील भाग पूर्ण सडला असून, पाण्यावरील भाग वाळून गेला होता.

कोल्हापूर : महापालिकेकडून (Kolhapur Municipal Corporation) सुरू असलेल्या नालेसफाईवेळी पुरुषाचा शिर नसलेला मृतदेह मिळून आला. मृतदेहावर केवळ अंतर्वस्त्र असून, तो सडलेल्या स्थितीत आहे. हुतात्मा पार्कमधील ओढ्यात गुरुवारी (ता. ४) सकाळी नऊच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. मृतदेहाची ओळख पटली नसून, परिसरात मृतदेहाचे शिर शोधण्यात येत होते. खून करून मृतदेह पुलाखाली फेकला की मद्यपी तोल जाऊन ओढ्यात पडला, याचा तपास पोलिस करीत आहेत.

Kolhapur Crime
Satara Lok Sabha : साताऱ्यासाठी सिल्वर ओकवर खलबते; उमेदवारीबाबत सस्पेन्स कायम, श्रीनिवास पाटलांचा पुन्हा लढण्यास नकार

पोलिसांनी (Police) दिलेली माहिती अशी, सावित्रीबाई फुले हॉस्पिटलच्या पिछाडीस ओढ्यात सकाळी जेसीबीने (JCB) गाळ काढणे सुरू होते; त्यावेळी जेसीबीसमोर मृतदेह मिळून आला. जेसीबीचालक सतीश गायकवाड (रा. वाकरे, ता. करवीर) यांनी ही माहिती पोलिसांनी कळवली. त्यानंतर पथक घटनास्थळी आले आणि जीवरक्षक दिनकर कांबळे यांच्या मदतीने मृतदेह शवविच्छेदनासाठी सीपीआरमध्ये पाठविण्यात आला. घटनास्थळी बघ्यांची गर्दी झाली होती. पुलावर वाहने उभी करून अनेकजण थांबत असल्याने वाहतूक कोंडी झाली होती.

सीसीटीव्ही फुटेज, मिसिंग रेकॉर्ड तपासणी

पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासकामी ताब्यात घेतले आहे. शहर, जिल्ह्यातील पोलिस ठाण्यांकडील बेपत्ता व्यक्तींची माहिती पडताळणी करण्यात येत आहे.

Kolhapur Crime
Sangli Lok Sabha : हातकणंगले सोडला, सांगलीचा हट्ट का? विश्‍वजित कदमांचा शिवसेनेला थेट सवाल

४० ते ४५ वयोगटातील पुरुष

मृताचे वय अंदाजे ४० ते ५० असून, शरीरावर केवळ अंतर्वस्त्र आहे. धडाचा पाण्यातील भाग पूर्ण सडला असून, पाण्यावरील भाग वाळून गेला होता. अंगावर कोणतीही जखम नसून, शिर वेगळे होताना कोणत्या हत्याराचा वापर झाल्याचीही शक्यता नसल्याचे पोलिसांनी सांगितले. अपर पोलिस अधीक्षक जयश्री देसाई, शहर उपअधीक्षक अजित टिके, जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे निरीक्षक संजीव झाडे आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com