Vaishnavi Powar Death Case
Vaishnavi Powar Death Caseesakal

Live in Relationship मध्ये राहण्याचा हट्ट करणाऱ्या वैष्णवीला मठातील महाराजाच्या सांगण्यावरून मारहाण; पाचवा संशयित अटकेत

सेवक प्रशांत शेवरेसह चौघांनी तिला काठी, सळईने केलेल्या बेदम मारहाणीत वैष्णवीचा दुर्दैवी मृत्यू झाला.
Summary

रिलेशनशिप’मध्ये राहण्याचा हट्ट धरणाऱ्या वैष्णवी लक्ष्मीकांत पोवार (वय २४, रा. शनिवार पेठ) हिची समजूत घालून या निर्णयापासून परावृत्त करण्याचे प्रयत्न आईकडून सुरू होते.

कोल्हापूर : ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये (Live in Relationship) राहण्याचा हट्ट करणाऱ्या वैष्णवी पोवार हिची आई, भावांच्या मारहाणीत मृत्यू झाल्या (Vaishnavi Powar Death Case) प्रकरणातील चौथा संशयित मठातील सेवक प्रशांत ऊर्फ नऱ्या संदीप शेवरे (वय २६, रा. देवठाणे) याला पोलिसांनी अटक केली. तर ही मारहाण मठातील महाराजाच्या सांगण्यावरून झाल्याचे मृत वैष्णवीची आई संशयित शुभांगी पोवार हिच्या चौकशीतून पुढे आल्याने त्याला पाचवा संशयित आरोपी करण्यात येणार असल्याचे पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांनी सांगितले.

Vaishnavi Powar Death Case
Chhattisgarh Bus Accident : दुर्ग जिल्ह्यात 50 फूट खोल खाणीत बस कोसळून 12 जण ठार; 38 प्रवासी जखमी

याप्रकरणी आईसह सख्खा भाऊ, मानलेला भाऊ असे तिघे अटकेत आहेत. रिलेशनशिप’मध्ये राहण्याचा हट्ट धरणाऱ्या वैष्णवी लक्ष्मीकांत पोवार (वय २४, रा. शनिवार पेठ) हिची समजूत घालून या निर्णयापासून परावृत्त करण्याचे प्रयत्न आईकडून सुरू होते. तिचे मतपरिवर्तन करण्यासाठी देवठाणे (ता. पन्हाळा) येथील मठामधील महाराजांकडे नेण्यात येत होते. संबंधित महाराज पुण्यातील एका भक्ताकडे राहण्यासाठी गेला होता.

यामुळे शुभांगी पोवार ही मुलगी वैष्णवी, मुलगा श्रीधर आणि मानलेला भाऊ संतोष आडसुळे यांना घेऊन बुधवारी (ता. ३) पुण्याला गेली. महाराजासमोर सर्वांनी वैष्णवीची समजूत काढण्याचा प्रयत्न केला; पण तिने स्वतः हा निर्णय बदलला नाही. यावर मारहाण करून तिला निर्णय बदलाला भाग पाडा, असा सल्ला महाराजाने दिला. त्यानंतर आई शुभांगी वैष्णवीला घेऊन देवठाणे येथील मठात (Devthane Math) आली.

Vaishnavi Powar Death Case
Sangli Lok Sabha : 'सांगली'च्या उमेदवारीवरुन काँग्रेसमध्ये संताप उसळला; विशाल पाटील बंडाच्या पवित्र्यात!

या ठिकाणी सेवक प्रशांत शेवरेसह चौघांनी तिला काठी, सळईने केलेल्या बेदम मारहाणीत वैष्णवीचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्याचीही रवानगी पोलिस कोठडीत करण्यात आली आहे. वैष्णवीला झालेली मारहाण मठातील महाराजाच्या सल्ल्याने झाल्याने त्यालाही अटक करण्यात येणार आहे. त्याच्या अटकेसाठी पथक पुण्याला रवाना करण्यात आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com