Ambabai Temple
Ambabai Templeesakal

Ambabai Temple : मणिकर्णिका कुंडासाठी दगड घडविण्याचे काम होणार सुरू; टेंबलाई टेकडीवर आणले दगड

मंदिरातील विविध विकासकामे सुरू करणाच्या हालचाली देवस्थान समितीकडून सुरू आहेत.
Summary

पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या (West Maharashtra Devasthan Committee) अंदाजपत्रकातून २१ कोटी ६८ लाख २६ हजार ७९४ इतक्या निधीची तरतुद केली होती.

कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरातील (Ambabai Temple) विविध विकासकामांना विधी व न्याय विभागाने निधीला मंजुरी दिल्यानंतर कामे सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. मंदिर परिसरातील मणिकर्णिका कुंडाच्या पुनरुज्जीवन लागणारे दगड टेंबलाई टेकडीवर आणण्यात आले आहेत. येत्या काही दिवसांत मणिकर्णिका कुंडातील दगडी बांधकामासाठी दगड घडविण्याचे काम येथे सुरू होणार आहे.

दरम्यान, गरूडमंडपासाठी लागणारे लाकूडही चंद्रपूरवरून येणार असून, टेंबलाई टेकडीवरच गरूडमंडपासाठी लागणारे लाकडी खांब व इतर लाकडी बांधकाम तयार केले जाणार आहे. अंबाबाई मंदिरातील विविध विकासकामांना गेल्या महिन्यात विधी व न्याय विभागाने मान्यता दिली. त्यासाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या (West Maharashtra Devasthan Committee) अंदाजपत्रकातून २१ कोटी ६८ लाख २६ हजार ७९४ इतक्या निधीची तरतुद केली होती.

Ambabai Temple
Alphonso Mango : आता QR Code च्या माध्यमातून ग्राहकांना मिळणार अस्सल 'हापूस'; प्रत्येक आंब्यावर लावला जाणार क्यूआर कोड

यानंतर आता मंदिरातील विविध विकासकामे सुरू करणाच्या हालचाली देवस्थान समितीकडून सुरू आहेत. दर्शन रांग शेतकरी संघाच्या इमारतीसमोरून अंबाबाई मंदिराचा विद्यापीठ दरवाजा, सरलष्कर भवन ते घाटी दरवाजा या ठिकाणी महापालिकेकडून भुयारी गटाराचे काम सुरू आहे. पावसाचे पाणी मंदिर आवारात साचून राहत होते, ते टाळण्यासाठी हे काम महापालिकेकडून केले जात आहे. त्यासाठी विद्यापीठ गेट ते सरलष्कर भवन परिसरात खोदाई करून काम सुरू आहे.

Ambabai Temple
'गंजिफा'सह लाकडी खेळण्यांना भारत सरकारकडून 'जीआय' मानांकन; सिंधुदुर्गच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा

मात्र, उन्हाळी पर्यटन हंगामात पर्यटक, भाविकांची गर्दी लक्षात घेता सरलष्कर भवन येथून दर्शनरांग करणे शक्य नाही. त्यामुळे पर्याय म्हणून शेतकरी संघाच्या इमारतीसमोरून दर्शन रांग करण्यात येणार आहे. तसेच भाविकांचा उन्हापासून बचाव व्हावा, यासाठी मंडपही घालण्यात येणार असल्याची माहिती समितीचे व्यवस्थापक महादेव दिंडे यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com