Alphonso Mango : आता QR Code च्या माध्यमातून ग्राहकांना मिळणार अस्सल 'हापूस'; प्रत्येक आंब्यावर लावला जाणार क्यूआर कोड

कोकणातील पाच जिल्ह्यांसाठी हापूस या नावाने जीआय (भौगोलिक निर्देशांक) मानांकन मिळाले आहे.
Konkan Hapus Mango
Konkan Hapus Mangoesakal
Summary

कोकणातील बागायतदारांनी हापूस आंब्याची विक्री करताना जीआय (भौगोलिक निर्देशांक) मानांकन घेणे आवश्यक आहे. आतापर्यंत कोकणातील १ हजार ७७३ जणांनी जीआय मानांकन घेतले आहे.

रत्नागिरी : ग्राहकांना अस्सल हापूस आंबा (Konkan Hapus Mango) मिळावा आणि शेतकऱ्याला चांगला दर मिळावा यासाठी कोकण हापूस आंबा उत्पादक आणि उत्पादक विक्रेते सहकारी संस्थेने जीआय नोंदणीकृत शेतकऱ्यांसाठी (Farmers) क्यूआर कोड उपलब्ध करून दिले आहेत. हापूस आंबा फळावर लावण्यासाठी सुमारे आठ लाख आणि पेटी किंवा बॉक्सवर लावण्यासाठी सुमारे एक लाख क्यूआर कोडचे लक्ष्य ठेवले आहे. क्यूआर कोडसाठी मीरो लॅब कंपनीबरोबर करार करण्यात आल्याचे संस्थेकडून सांगण्यात आले.

Konkan Hapus Mango
'सतेज' पाठिंबा अन् महाडिकांना मिळालं दहा हत्तीचं बळ; पवारांची मनधरणी आणि मुश्रीफांची मध्यस्थी ठरली निर्णायक!

कोकणातील पाच जिल्ह्यांसाठी हापूस या नावाने जीआय (भौगोलिक निर्देशांक) मानांकन मिळाले आहे. त्यासाठी मानांकन देण्यासाठी निवडलेल्या संस्थांमध्ये कोकण हापूस आंबा उत्पादक आणि उत्पादक विक्रेते सहकारी संस्थचा समावेश आहे. जीआय नोंदणीसाठी (GI Registration) संस्थेकडून प्रयत्न सुरु आहेत. ग्राहकाला दर्जेदार हापूस मिळावा यासाठी सुमारे दोन वर्षापूर्वी उत्पादक संस्थेचे अध्यक्ष डॉ. विवेक भिडे यांच्या संकल्पनेतून क्युआर कोड प्रक्रिया राबविण्यात आली. त्यात काही त्रुटी जाणवल्या होत्या.

त्यामध्ये क्यूआर कोडला एक्सपायरी डेट नसल्यामुळे तो पुन्हा वापरला जाण्याची शक्यता होती. त्याचा पुनर्वापर करून गैरफायदा घेतला जाऊ शकत होता. मागीलवेळच्या त्रुटी दूर करून यंदा क्यूआर कोड नव्याने निर्माण केले आहेत. त्यामध्ये मुदतबाह्य (एक्सपायरी) तारीख, आंबा पॅकिंगची तारीख, आंबा परिपक्व होण्याची तारीख, हापूस आंबा बागायतदाराची सविस्तर माहिती म्हणजे बागेचे फोटो, गुगल लोकेशन, शेतकऱ्यांची माहिती, त्यांचे मोबाईल नंबर, ई-मेल वगैरे अनेक आवश्यक गोष्टी कोडमार्फत मिळू शकतात. चांगल्या आंब्यामुळे सतत ग्राहक मिळत राहावा, यादृष्टीने कोडमध्ये सुधारणा केल्या गेल्या.

Konkan Hapus Mango
Mumbai-Goa Highway : कशेडी-परशुराम घाटात वाढले 'ब्लॅक स्पॉट'; आतापर्यंत 11 अपघात, 'इतक्या' जणांनी गमावला जीव

क्यूआरकोड ६५ पैसे प्रति आंबा या दराने दिला जात असून बॉक्सवरील कोड तीन रुपये दराने दिला जाणार आहे. बागायतदारांना कोड अ‍ॅक्टिव्ह कसा करावा, यासंबंधी प्रशिक्षणही दिले जात आहे. प्रचार, प्रसार, शिबिरे घेणे व शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने कार्यक्रम उत्पादक संस्था घेत आहे. शासनाच्या एखाद्या योजनेमधून संस्थेला अनुदान मिळाले तर संस्था दहा पट वेगाने जीआय नोंदणीचा प्रसार करू शकते व बागायतदारांना कमी दरामध्ये मार्केटिंगसाठी क्यूआर कोड पुरवू शकेल, असे संस्थेकडून सांगण्यात आले.

शासनस्तरावर वेगवेगळ्या खात्यांच्या माध्यमातून हापूस आंब्याच्या विक्रीवेळी होणारी भेसळ रोखली गेली तर हापूस आंब्याला आणि बागायतदारांना सुखद दिवस येतील. त्यासाठी सर्वच खात्यांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे. पणन महामंडळाकडून चांगला पाठपुरावा केला जात आहे.

-मुकुंदराव जोशी, सचिव, कोकण हापूस आंबा उत्पादक संस्था

Konkan Hapus Mango
'गंजिफा'सह लाकडी खेळण्यांना भारत सरकारकडून 'जीआय' मानांकन; सिंधुदुर्गच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा

१७७३ जणांकडे जीआय

कोकणातील बागायतदारांनी हापूस आंब्याची विक्री करताना जीआय (भौगोलिक निर्देशांक) मानांकन घेणे आवश्यक आहे. आतापर्यंत कोकणातील १ हजार ७७३ जणांनी जीआय मानांकन घेतले आहे. त्यातील १ हजार ५७ जणांनी कोकण हापूस आंबा उत्पादक आणि उत्पादक विक्रेते संस्थेकडे जीआयसाठी नोंदणी केलेली आहे, असे संस्थेचे अध्यक्ष डॉ. विवेक भिडे यांनी सांगितले.

  • खरेदी केलेल्या प्रत्येक आंब्याचे होणार स्कॅनिंग

  • प्रत्येक आंब्यावर लावला जाणार क्यूआर कोड

  • प्रतवारी केलेला अस्सल हापूस ग्राहकांपर्यंत

  • ग्राहकांनाही उपलब्ध होणार शेतकऱ्यांची संपूर्ण माहिती

  • एकाच ब्रँडनेमखाली हापूस जाणार ग्राहकांपर्यंत

  • शेतकरी आणि ग्राहकांमध्ये कंपनी दुवा साधणार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com