

दाभोलकर ट्रस्टतर्फे
हिमोफिलिया शिबिर
कोल्हापूर : दाभोलकर चॅरिटेबल ट्रस्ट, इंटास फौंडेशन आणि सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयातर्फे आरोग्य तपासणी, फिजीओथेरपी आणि हिमोफिलिया रुग्णांसाठी मोफत फॅक्टर इंजेक्शन वितरण शिबिर घेतले. दाभोलकर चॅरिटेबल हॉस्पिटल येथे शिबिर झाले. इंटास फौंडेशनचे सूरज माळी यांनी फौंडेशनच्या विविध समाजोपयोगी योजनांची माहिती दिली. संस्था कॅन्सर रुग्णांना मदत, हिमोफिलिया रुग्णांना फॅक्टर वाटप आणि स्वत: फॅक्टर इंजेक्शन घेण्याबाबत प्रात्यक्षिक, फिजीओथेरपी उपचार करत आहे. १० वी, १२ वीच्या परीक्षेत ११ हिमोफिलाया विद्यार्थ्यांचा सत्कार झाला. दाभोलकर चॅरीटेबल ट्रस्टचे विश्वस्त शशिकांत प्रभू, डॉ. मेघना कामत, गिरीश सामंत उपस्थित होते. जितेंद्र सावंत यांनी हिमोफिलिया सेंटर कोल्हापूरबाबत माहिती दिली. डॉ. अरविंद मांजरेकर, डॉ. अभिजीत गुणे यांनी रुग्णांची तपासणी करून सल्ला दिला. शिबिरात १२० रुग्ण आणि नातेवाईक उपस्थित होते. फिजिओथेरपिस्ट डॉ. सिंथिया जगताप, डॉ. प्रवीण कोळी, दाभोलकर चॅरीटेबल ट्रस्टच्या समन्वयक गीता पोवार, कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.