Kolhapur Loksabha: भाजपने कोल्हापूर लोकसभेची जबाबदारी दिली मामांकडे? माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान जिल्हा दौऱ्यावर

Kolhapur Loksabha: भाजपने कोल्हापूर लोकसभेची जबाबदारी दिली मामांकडे? माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान जिल्हा दौऱ्यावर

EX CM शिवराजसिंह चौहान जिल्हा दौऱ्यावर, लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा घेणार आढावा

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २२ : मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान शनिवारी (ता.२४) दौऱ्यावर येणार आहेत. यामध्ये ते जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहेत. स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत विविध उपक्रमांत ते सहभागी होणार आहेत. त्यांच्या दौऱ्यासंबंधी आज भाजप कार्यालयात पक्षाची बैठक झाली.

बैठकीला खासदार धनंजय महाडिक, महेश जाधव, राजे समरजितसिंह घाटगे, जिल्हाध्यक्ष विजय जाधव, राहुल देसाई, राजवर्धन नाईक-निंबाळकर, सत्यजित देशमुख, निशिकांत पाटील, संग्राम कुपेकर, अशोक माने यांच्यासह प्रमुख पदाधिकारी, नेत्यांची उपस्थिती होती.

दरम्यान, सकाळी ७.२० वाजता कोल्हापूर रेल्वे स्थानकात चौहान यांचे आगमन होईल. नऊ वाजता ते अंबाबाई मंदिरात दर्शन घेतील. बिंदू चौक येथे साडेनऊ वाजता होणाऱ्या चाय पे चर्चा कार्यक्रमात ते सहभागी होतील. दुपारी अकरा वाजता मासिक दरबार हॉल येथे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतील. दोन वाजता हातकणंगले येथील रुक्मिणी हॉल येथे कार्यकर्ता मेळाव्याला उपस्थित राहतील. तिथून ते साताऱ्याकडे प्रयाण करतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com