School
Schoolsakal

Kolhapur News : जिल्‍हा परिषदेच्‍या शाळेला हवेत लिपिक; शिक्षकांनाच करावी लागताहेत कामं

जिल्‍हा परिषदेच्‍या शाळेत हवे लिपिक; शिक्षकांनाच करावी लागतात कामे
Published on
Summary

जिल्‍हा परिषद शाळातील गुणवत्ता वाढवण्‍यासाठी प्रयत्‍न सुरू आहेत.

कुंभोज : जिल्‍हा परिषदेच्‍या विविध घटक शाळांतून सेवकांची कामे तर शिक्षक, विद्यार्थ्‍यांनाच करावे लागते; परंतु राज्‍यातील जिल्‍हा परिषद केंद्रीय शाळेत शिक्षकच लिपिकाचे काम करत असल्‍याचे चित्र असून किमान प्रत्‍येक केंद्रीय शाळेत तरी लिपिकाचे पद निर्माण करण्‍याची मागणी होत आहे.

जिल्‍हा परिषद शाळातील गुणवत्ता वाढवण्‍यासाठी प्रयत्‍न सुरू आहेत. पण शाळांना चांगले रूप येत असून रंगरंगोटी, बोलक्‍या भिंती, सचित्र शाळा, चिमुकल्‍यांच्‍या खेळासाठी सुविधा अशा उपक्रमांमुळे विद्यार्थी शाळातून चांगलेच रमत आहेत. परंतु अशा स्‍थितीत जिल्‍हा परिषद शाळांचे केंद्र असलेल्‍या केंद्रीय शाळेतही लिपिकाचे पद नसल्‍याने शिक्षकांनाच करावे लागतात लिपिकाचे कामे अशी स्‍थिती आहे.

School
Bhogavati Election : ..अखेरच्या क्षणी 'शेकाप'मध्ये उभी फूट; गोकुळच्या अध्यक्षांचाही आमदार पाटलांना पाठिंबा, तिरंगी लढतीत कोणाची बाजी?

केंद्रातील शाळांची संख्‍या दहा ते पंधरा असते. पन्‍नास ते शंभरपर्यंत शिक्षक संख्‍या असलेल्‍या केंद्रीय शाळांत लिपिक पदच नसल्‍याने गैरसोय वाढली आहे. खासगी संस्‍थेच्‍या शाळेत मात्र लिपिक पदाला मंजुरी दिली जाते. राज्‍यात मात्र जिल्‍हा परिषदेच्‍या केंद्रीय शाळेत आवश्‍यकता असूनही त्‍याकडे दुर्लक्ष केले जात आहे. जिल्‍हा परिषदेच्‍या प्राथमिक घटक शाळेतून सेवक ही नाहीत. त्‍यामुळे ही कामे शिक्षक व विद्यार्थी करताना दिसतात. प्राथमिक शाळांचे केंद्र असलेल्‍या केंद्रीय शाळेत लिपिक नाही. तर केंद्रप्रमुखांना टपालसेवेचे काम बजावावे लागते.

त्‍यामुळे त्‍यांचा मुख्‍य उद्देश बाजूलाच राहतो, अशी स्‍थिती आहे. केंद्रातील अनेक शाळेतील शिक्षकांचे वेतन, इतर माहिती, नियमित वेतनातील कपाती, विविध प्रकारची विहीत नमुन्‍यातील माहिती आदी कामे शिक्षकांनाच करावी लागतात. त्‍यामुळे शासनाने तत्‍काळ अशा केंद्रात किमान एक तरी लिपिक व संगणक उपलब्‍ध करून द्यावे, अशी मागणी होत आहे.

जिल्‍हा परिषद केंद्रीय शाळेत विविध माहितीचे संकलन करावे लागते. मुख्‍याध्‍यापकांना प्रशासकीय कार्यासह, शाळेचे व्‍यवस्‍थापन, अनेक ऑनलाईन नोंदी व अध्‍ययन, अध्‍यापनसुद्धा करावे लागते म्‍हणून प्रत्‍येक केंद्रीय मुख्‍याध्‍यापकांना मदतीसाठी लिपिकाची अत्‍यंत आवश्‍यकता आहे. शासनाने किमान केंद्रीय शाळेत लिपिक पद भरून कार्यालयीन कामांना गतिमानता आणावी.

-संजय कुंभार, जिल्‍हा उपाध्‍यक्ष, महाराष्‍ट्र राज्‍य प्राथमिक शिक्षक समिती, कोल्‍हापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com