Bhogavati Election : ..अखेरच्या क्षणी 'शेकाप'मध्ये उभी फूट; गोकुळच्या अध्यक्षांचाही आमदार पाटलांना पाठिंबा, तिरंगी लढतीत कोणाची बाजी?

उमेदवारी अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी नाट्यमय घडामोडी घडत तीन आघाड्या आकारास आल्या.
Bhogavati Sugar Factory PN Patil Kolhapur
Bhogavati Sugar Factory PN Patil Kolhapuresakal
Summary

सत्ताधाऱ्यांच्या विरोधात तोडीस तोड पॅनेल देण्याची हिंमत बांधणाऱ्या सर्व विरोधी नेत्यांमध्ये आज दुफळी दिसून आली.

राशिवडे बुद्रुक : भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी (Bhogavati Sugar Factory Election) उमेदवारी अर्ज माघारीच्या कालच्या अखेरच्या दिवशी नाट्यमय घडामोडी घडत तीन आघाड्या आकारास आल्या. ‘शेकाप’मध्ये उभी फूट पडली असून, सत्ताधारी विरोधात नेतृत्व करणारे गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे (Arun Dongle) हे आमदार पी. एन. पाटील (P. N. Patil) यांच्या पंक्तीला येऊन बसले.

दुसरीकडे विरोधात काँग्रेसचा चरापले गट, भाजप, शिवसेना, शेतकरी संघटना (Shetkari Kamgar Paksh) यांची दुसरी तर माजी अध्यक्ष धैर्यशील पाटील यांची तिसरी आघाडी निर्माण झाली आहे. या निवडणुकीमध्ये कारखाना डबघाईला आल्याच्या कारणावरून बिनविरोधची भाषा पहिल्यापासूनच केली गेली.

Bhogavati Sugar Factory PN Patil Kolhapur
मोडी लिपीतील कुणबी मराठा ओळखणं होणार शक्य; मुस्लिम राजवटीत या लिपीचा सर्वाधिक वापर, जुन्या कागदपत्रांतही उल्लेख

मात्र, बिनविरोधच्या अडून राजकारण तापले आणि त्याचे रूपांतर तीन आघाड्यांमध्ये झाले. दोन दिवसांपूर्वी विद्यमान अध्यक्ष आमदार पी. एन . पाटील यांच्यासोबत माजी आमदार संपतराव पवार-पाटील हे सर्व शेकापक्ष घेऊन सहभागी झाल्याची घोषणा ए. वाय. पाटील यांच्या साक्षीने झाली. त्यांना शह देण्यासाठी सर्व गट एकत्र येणार अशी शक्यता होती. मात्र, आज माघार घेण्याच्या अखेरच्या दिवशी दिवसभर नाट्यमय घडामोडी घडल्या.

Bhogavati Sugar Factory PN Patil Kolhapur
Bhogavati Factory Election : 'भोगावती'चं राजकारण तापलं! निवडणुकीत बाहेरच्या नेत्यांचा हस्तक्षेप, खमक्या नेत्याची सभासदांना प्रतीक्षा

सत्ताधारी पक्षाला बळ देणाऱ्या शेतकरी कामगार पक्षात उभी फूट पडली. त्यातील एक मोठा गट परिवर्तन आघाडीला मिळाला, तर काहीजण धैर्यशील पाटील यांच्या गोटात सामील झाले. स्वाभिमानी पक्ष आणि चरापले यांच्याबरोबर हात मिळवणी केलेल्या भाजपचे एक उमेदवार धैर्यशील पाटील यांच्याकडे गेला, तर ‘शेकाप’ने तिन्ही आघाड्यांमध्ये वर्णी लावून घेतली आहे. काँग्रेसची ही स्थिती तीच आहे.

बलाढ्य सत्ताधारी गट आमदार पाटील यांच्या नेतृत्वाखाली असतानाच उर्वरित दोन्ही गटांमध्ये काँग्रेसचे उमेदवार दिसतात. आमदार पाटील यांचे पुतणे विक्रांतसिंह पाटील हे परिवर्तन आघाडीमध्ये आहेत. धैर्यशील पाटील यांच्या आघाडीत काँग्रेसचे प्रतिनिधी आहेत. राष्ट्रवादीचेही अनेक उमेदवार तीन्ही आघाड्यांमध्ये आहेत. फक्त स्वाभिमानी शेतकरी संघटना स्वाभिमान जपून एकाच आघाडीमध्ये सहभागी झाली आहे. विरोधात गेले काही दिवस व्यूहरचना करणारे गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे फुटीचे वातावरण बघून अचानक आमदार पाटील यांच्या पंक्तीला जाऊन बसले . त्यामुळे त्यांना काहीसे बळ निर्माण झाल्याचे दिसते.

Bhogavati Sugar Factory PN Patil Kolhapur
Maratha Reservation : घरात अडगळीत पडलेली ट्रंक उघडली अन् अख्ख्या गावाच्या सापडल्या कुणबी नोंदी!

विरोधी नेत्यांमधील दुफळी स्पष्ट

सत्ताधाऱ्यांच्या विरोधात तोडीस तोड पॅनेल देण्याची हिंमत बांधणाऱ्या सर्व विरोधी नेत्यांमध्ये आज दुफळी दिसून आली. धैर्यशील पाटील यांनी स्वबळावर आघाडी निर्माण करतानाच लवचिकतेऐवजी स्वतःच्या अस्तित्वाचा मुद्दा रेटला. दुसरीकडे शेकाप आणि भाजपला अपेक्षेपेक्षाही अधिक जागा आघाड्यांमध्ये मिळवता आल्या. माजी आमदार चंद्रदीप नरके गटानेही उमेदवारी स्वीकारली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com