Kolhapur News: पन्हाळगडावर पर्यटकांना जाण्यास बंदी! ऐतिहासिक मजारीची समाज कंटकांकडून नासधुस अन्...

पन्हाळगड येथील ऐतिहासिक तानपीर मजारीची अज्ञात समाज कंटकांनी नासधुस केली
Kolhapur News
Kolhapur NewsEsakal

कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळगड येथील ऐतिहासिक तानपीर मजारीची अज्ञात समाज कंटकांनी नासधुस केली आहे. यानंतर पन्हाळ गडावर पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. हिंदू आणि मुस्लिम बांधवांनी या तानपीर मजारीची डागडुजी सुरू केली आहे. काही दिवसांपूर्वी या तानपीर मजारीबाबत सोशल मिडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल झाली होती. त्यानंतर रात्री या तानपीर मजारीची नासधूस झाली आहे. (Latest Marathi News)

याच पार्श्वभूमीवर पन्हाळगडावर सध्या पर्यटकांना प्रवेश दिला जात नाही. पूर्ण प्रकरण शांत झाल्यानंतर पर्यटकांना गडावर सोडलं जाईल. त्यामुळे सध्या पन्हाळगडावर कमालीची शांतता दिसून येत आहे.

रात्री 4 वाजता पुजारी पूजा करण्यासाठी गेले तेव्हा तेथे नासधूस केल्याचं दिसून आलं. त्यानंतर स्थानिकांनी आणि दोन्ही समाजांनी एकत्रित येत डागडुजी केली आहे. काही समाज कंटकांनी हे मुद्दाम केल्याचं स्थानिकांनी म्हंटलं आहे. पन्हाळगडावर हिंदू मुस्लिम बांधव एकत्र गुण्यागोविंदाने राहत आहेत. याआधी एक आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल झाली त्यानंतर ही घटना घडली असल्याचं स्थानिकांनी म्हंटलं आहे.(Latest Marathi News)

Kolhapur News
HSC Result 2023: बारावीच्या निकालाची मार्कशीट कधी मिळणार? फोटोकॉपी साठी मुदत किती? जाणून घ्या सर्व माहिती

दोन्ही समाज एकत्र राहतात यांच्यात फुट पाडण्यासाठी काही अज्ञात समाज कंटकांनी तानपीर मजारीची नासधुस केली आहे. याबाबत काही आक्षेपार्ह पोस्ट आल्यास ती फॉरवर्ड न करता डिलिट करा असं आवाहनही पन्हाळगडावरील दोन्ही समाजाच्या बांधवांनी केलं आहे.(Latest Marathi News)

Kolhapur News
LIVE Marathi News Updates: देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाचं उद्घाटन

तर याबाबत कोल्हापूरच्या पोलिस अधिक्षकांनी प्रतिक्रिया देताना म्हंटलं की,'काही दिवसांपूर्वी पन्हाळगड येथील ऐतिहासिक तानपीर मजारीबाबतचे काही मिम्स सोशल मिडियावर व्हायरल झाली होती. त्यानंतर आज ही घटना समोर आली आहे. या घटनेची सकाळी माहिती मिळताच पोलिसांनी तेथील स्थानिक नागरिक ट्रस्टी आणि इतर सदस्यांशी तातडीची बैठक घेतली.

या प्रकरणात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील कारवाई कायद्याच्या चौकटीत होईल. सोशल मिडियावर पोस्ट टाकणाऱ्यांवरही आमचं लक्ष असणार आहे असं पोलिसांनी सांगितलं आहे.(Latest Marathi News)

Kolhapur News
HSC Result 2023 Live Updates : बारावीच्या परीक्षेत यंदा 12 लाख 92 हजार 468 विद्यार्थी उत्तीर्ण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com