Kolhapur : पर्यटकांसाठी महत्वाची बातमी! जिल्ह्यातील 'या' अभयारण्यात पर्यटकांना प्रवेश बंदी

पर्यटकांच्या (Tourists) सुरक्षिततेच्या दृष्टीने जून महिन्याच्या प्रारंभी शासनाकडून पर्यटकांना प्रवेश बंदी केली जाते.
Chandoli Sanctuary
Chandoli Sanctuaryesakal
Summary

चांदोली अभयारण्य, चांदोली धरण व परिसरात अतिवृष्टी असते.

तुरुकवाडी : चांदोली धरण व अभयारण्य (Chandoli Sanctuary) प्रवेश पर्यटकांसाठी मंगळवार (ता. १३) पासून बंद करण्यात आला असल्याची माहिती सहायक अभियंता मिलिंद किटवाडकर यांनी दिली.

Chandoli Sanctuary
Ashadhi Wari : धनी मला ही दाखवा ना विठूरायाची पंढरी! पंढरपूरला जाण्यासाठी तब्बल 'इतक्या' बसेसची सोय

चांदोली अभयारण्य, चांदोली धरण व परिसरात अतिवृष्टी असते. पर्यटकांच्या (Tourists) सुरक्षिततेच्या दृष्टीने जून महिन्याच्या प्रारंभी शासनाकडून पर्यटकांना प्रवेश बंदी केली जाते. दरम्यान, चांदोली धरणात ११.८७ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. उपलब्ध पाण्यापैकी ४.९९ टीएमसी म्हणजे जवळपास ५ टीएमसी पाणीसाठा उपयुक्त आहे.

Chandoli Sanctuary
Kagal : आक्षेपार्ह स्टेटसमुळं कागलमध्ये तणाव; हिंदुत्ववादी संघटना आक्रमक, पोलिसांचं शांततेचं आवाहन

किमान दोन महिने पुरेल इतका पाणीसाठा धरणात सध्या उपलब्ध आहे. चांदोली धरणाची पाणी साठवण क्षमता ३४.४० टीएमसी इतकी आहे. दरवर्षी धरण शंभर टक्के भरते. याही वर्षी धरण शंभर टक्के भरले होते. मात्र धरण प्रशासनाच्या काटेकोर नियोजनामुळे जवळपास ५ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा यावर्षी शिल्लक आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com