
कोल्हापूर सीबीएस परिसरातील लॉजमध्ये गुजरातच्या व्यापाऱ्याने घेतला गळफास
esakal
Kolhapur Police : चार दिवसांपासून मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील लॉजमध्ये राहणाऱ्या व्यापाऱ्याने गळफास लावून घेतल्याचा धक्कादायक प्रकार आज सकाळी उघडकीस आला. दिनेशभाई महादेवभाई छतरोला (वय ४५, रा. सुरत, गुजरात) असे मृताचे नाव आहे. आज सकाळपासून खोलीमधून दुर्गंध येऊ लागल्याने कर्मचाऱ्यांनी डोकावून पाहिले असता छतरोला यांनी दोरीने पंख्याच्या हुकास गळफास लावून घेतल्याचे दिसून आले. याची नोंद शाहूपुरी पोलिस ठाण्यात झाली. संबंधिताने आत्महत्येपूर्वी स्वतःचा मोबाईल, सीमकार्ड तोडल्याचे दिसले. पोलिस नातेवाईकांचा शोध घेत आहेत.