
Kolhapur Traffic
esakal
थोडक्यात :
प्रत्येक पार्किंगमध्ये मोबाईल टॉयलेटची सुविधा, फेरीवाल्यांच्या अतिक्रमणाला चाप लागणार
गुजरीत दोन्ही बाजूला पार्किंगची सुविधा, पाऊस थांबल्यानंतर पार्किंगसाठी पांढरे पट्टे मारणार
५ टॉयलेट, घंटागाडी, १२ ड्रम व दुर्गंधीनाशक लिक्विड फवारणी
सरस्वती टॉकीज बहुमजली पार्किंगमध्ये ३०० वाहनांची सुविधा उद्यापासून
अतिक्रमण निर्मूलनसाठी ५० कर्मचाऱ्यांची नेमणूक, अनधिकृत रिक्षा थांबे हटणार
Kolhapur Navratri Traffic : नवरात्रोत्सव तसेच दीपावलीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर शहरातील महाद्वार रोड, ताराबाई रोड, जोतिबा रोड, गुजरी व भाऊसिंगजी रोड हा परिसर वाहतुकीसाठी खुला ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. यामुळे व्यापाऱ्यांना दिलासा मिळाला असला तरी मंदिर परिसरातील फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावर कडक कारवाई करण्याची मागणी व्यापाऱ्यांकडून होत आहे. अंबाबाई मंदिर परिसरातील गर्दी, वाहतूक कोंडी, स्वच्छतागृह व पार्किंग समस्यांबाबत उपाययोजना करण्यासाठी महापालिका, वाहतूक नियंत्रण शाखा, पोलिस प्रशासन, महाद्वार रोड व्यापारी असोसिएशन व सराफ संघ यांची आज संयुक्त बैठक घेण्यात आली.