
Kolhapur CBS Crime
esakal
एसटी वाहतूक नियंत्रकाचा आत्महत्येचा प्रकार:
कोल्हापूर मध्यवर्ती बसस्थानकाचे प्रभारी वाहतूक नियंत्रक अनिल शंकरराव खाडे (५५) यांनी बसस्थानकाच्या विश्रांती कक्षाच्या चौकटीला गळफास घेऊन आत्महत्या केली.
घटनेचा क्रम:
तब्बेत बरी नसल्याचे सांगून त्यांनी दुपारी रजा घेतली; मात्र, घरी न जाता विश्रांती कक्षात गळफास घेतला. चालकाला ही घटना दिसून आल्यानंतर वरिष्ठांना माहिती देण्यात आली.
पोलिस व वैद्यकीय कार्यवाही:
सहकाऱ्यांनी खाडे यांना गळफास सोडवून सीपीआर रुग्णालयात आणले; पण उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. शाहूपुरी पोलिस ठाण्यात नोंद झाली असून आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
Kolhapur MSRTC Rest Room Incident : कोल्हापूर मध्यवर्ती बसस्थानकाचे वाहतूक नियंत्रक अनिल शंकरराव खाडे (वय ५५, रा. शाहू मिल कॉलनी) यांनी एसटी स्टॅन्ड आवारातील विश्रांती कक्षात गळफास घेऊन आत्महत्या केली. दुपारीच तब्बेत बरी नसल्याचे सांगून रजा मंजूर करून घेतली होती. मात्र, घरी न जाता त्यांनी विश्रांती कक्षाच्या चौकटीला गळफास घेऊन जीवन संपविले. आज सायंकाळी हा प्रकार उघडकीस आला. शाहूपुरी पोलिस ठाण्यात याची नोंद झाली.