Tavandi Ghat : सुरुंगाच्या स्फोटांमुळं पुणे-बंगळूर महामार्ग ठप्प; दोन तास वाहनं अडकली, सलग तीन दिवस अडथळा

गेल्या काही दिवसात महामार्गावरील वाहतूक विस्कळीत बनली आहे.
Traffic jam Tavandi Ghat on Pune Bangalore National Highway
Traffic jam Tavandi Ghat on Pune Bangalore National Highway esakal
Summary

तवंदी मोठा डोंगर असल्याने महामार्ग निर्मिती विभागाकडून सुरुंग लावून डोंगर फोडला जात आहे.

निपाणी : येथील राष्ट्रीय महामार्गावरील (Pune Bangalore Highway) तवंदी घाटात (Tavandi Ghat) सुरुंग, ब्लास्टिंगच्या कारणाने मागील शुक्रवारी (ता. २४) दोन तास वाहतूक ठप्प झाली. मागील तीन दिवसांपासून येथे सुरुंग लावण्यासह ब्लास्टिंगव्दारे डोंगर फोडला जात असल्याने महामार्गावरील वाहतुकीत अडथळा निर्माण झाला आहे.

यामुळे तासनतास वाहनधारकांना महामार्गावर खोळंबून रहावे लागत आहे. यामध्ये मालवाहू वाहनांसह खासगी कारगाड्या, बसगाड्यांचाही समावेश असल्याने वाहनधारकांसह प्रवाशांचे हाल होत आहेत. येथे राष्ट्रीय महामार्गाच्या सहापदरीकरणाचे काम वेगात सुरु आहे.

Traffic jam Tavandi Ghat on Pune Bangalore National Highway
Sangli Politics : जयंत पाटलांच्या गडाला धक्के देण्याचे अजितदादा गटाचे मनसुबे; 'या' नव्या शिलेदारांची लागणार कसोटी

यामुळे गेल्या काही दिवसात महामार्गावरील वाहतूक विस्कळीत बनली आहे. परिणामी वाहनधारक, प्रवाशांना अडचणींचा सामना करत महामार्गावर प्रवास करावा लागत आहे. याशिवाय ठिकठिकाणी महामार्गावर अडथळे आणि वळणांमुळे वाहनधारकांचा खूप वेळ जात आहे. दररोज एका ठिकाणी नवे वळण निर्माण केले जात असल्याने नवीन वाहनधारकांचा महामार्गावर गोंधळ उडत आहे. अशातच तवंदी घाटात अनेक दिवसांपासून डोंगरातून महामार्ग नेण्यासाठी डोंगऱ फोडण्याचे काम सुरू आहे.

मोठा डोंगर असल्याने महामार्ग निर्मिती विभागाकडून सुरुंग लावून डोंगर फोडला जात आहे. त्याचा धोका अनेक दिवसापासून तवंदीसह परिसरातील गावातील नागरिकांना निर्माण झाला आहे. हादऱ्यामुळे घरांना भेगा जाणे, सुरुंग आणि ब्लास्टिंगचा मोठा आवाज होणे, पाणी पुरवठ्यात अडथळा अशा अनेक अडचणी येत आहेत. याशिवाय खबरदारी म्हणून महामार्गावरील वाहतूक दीड-दोन तास थांबवली जाते. याकाळात निपाणीतून बेळगावला जाणा-या प्रवाशांना बेळगावमध्ये पोचण्यास चार-साडेतास लागत आहेत.

Traffic jam Tavandi Ghat on Pune Bangalore National Highway
'उद्या तोडगा निघाला नाही तर एकही वाहन रस्त्यावर फिरू देणार नाही'; सांगलीतील कारखानदारांना राजू शेट्टींचा इशारा

आपत्कालीन सेवांची गैरसोय

सुरुंग, ब्लास्टिंगवेळी तासनतास वाहतूक थांबते. वाहतुकीत रुग्णवाहिकेसह अन्य अत्यावश्यक सेवेची वाहने असतात, त्यांची गैरसोय होत आहे. शिवाय असंख्य लोकांना दवाखान्यासह काही महत्त्वाच्या कामासाठी वेळेत पाहोचायचे असते. पण महामार्ग थांबल्यामुळे पुढील नियोजन कोलमडत आहे. थांबलेल्या वाहनांमध्ये दूध वाहतूक करणारी वाहनेही मोठ्या प्रमाणात असतात, त्यांचाही खोळंबा होत आहे. पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर सहापदरीकरणाचे काम सुरू असल्याने अनेक ठिकाणी अडथळे येत आहेत. त्यातून मार्ग काढताना वाहनधारकांची कसरत सुरू आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com