

कोल्हापूर दाजीपूर अभयारण्यात भीषण अपघातात दोन ठार
esakal
Kolhapur Radhanagari Accident : (राजू पाटील) : कोल्हापूर–राधानगरी–कोकण राज्य मार्गावर मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला असून दोघे गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात अभयारण्यातील शेळप–बांबर गावादरम्यान घडला. यामध्ये अनुराग अनूप सोनी (वय. ३३ सह्याद्रीनगर, सांगली ) व अभिजीत बापू कुंभार (४२, रा. मगरमच्छ कॉलनी गवळी गल्ली, सांगली) हे जागीच ठार झाले. तर दोघे जखमी झाले असून त्यांच्यावर सीपीआरमध्ये उपचार सुरू आहेत.