कोल्हापूर : कार्यकाल पूर्ण केलेल्या अधिकाऱ्यांच्या होणार बदल्या

जिल्हा परिषद, महापालिका निवडणूक ; दोन उपजिल्हाधिकाऱ्यांसह दहा तहसीलदारांचा समावेश
 transfer
transfer sakal

कोल्हापूर : जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यात एकाच पदावर तीन वर्ष काम केलेल्या अधिकाऱ्यांची बदल्या केल्या जाणार आहेत. राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशानुसार जिल्हा प्रशासनाच्या वतीने ही माहिती संकलित करण्याचे काम सुरू आहे. उद्या (ता. २९) ही सर्व माहिती महसूल विभागाकडे पाठवली जाणार आहे. दरम्यान, यामध्ये करवीर व पन्हाळा तालुक्‍यातील उपजिल्हाधिकारी संवर्गातील दोन व दहा तहसीलदारांच्या बदल्या होऊ शकतात.(Officers who have served in the same post for three years will be transferred) 

 transfer
हिंगोली : रस्त्यावर बसून आजीला लस घेण्यासाठी केले मत परिवर्तन

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कर्तव्यदक्ष व निष्पक्ष अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून घेतल्या जातात. प्रतिबंधात्मक व इतर उपाययोजना करण्याच्या अनुषंगाने उपजिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांच्या सेवाविषयक बाबींसंदर्भातील आवश्‍यक माहिती तात्काळ देण्याच्या सूचना दिल्या आहेत. राज्यात यावर्षी २५ जिल्हा परिषद, २८३ पंचायत समित्या, १५ महापालिका तसेच अडीच हजारहून अधिक ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. राज्यात कोरोना, आरक्षणासह इतर कारणांमुळे वेळोवेळी निवडणूका पुढे ढकलल्या आहेत. सध्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्यामुळे मार्च २०२२ पर्यंत ज्यांची एकाच जिल्ह्यात तीन वर्ष कार्यकाळ पूर्ण झाला आहे. एखादा जिल्ह्यातील स्थानिक अधिकारी आहेत, अशांची माहिती घेऊन त्यांची इतरत्र बदली केली जाणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com