Kini Toll Plaza Accident : किणी टोल नाक्यावर तिहेरी अपघात; कार घुसली थेट एसटी बसखाली, चालकाचा ताबा सुटला अन्..

Triple accident at Kini toll plaza : किणी (ता. हातकणंगले) येथील टोल नाक्यावर (Kini Toll Plaza) टोल भरण्यासाठी थांबलेल्या मोटारीला पाठीमागून कंटेनरने जोरदार धडक दिल्याने मोटार समोर असलेल्या एसटी बसला धडकली.
Kini Toll Plaza Accident
Kini Toll Plaza Accidentesakal
Updated on
Summary

किणी टोल नाक्यावरील सहा क्रमांकाच्या बूथच्या लेनमध्ये मुंबईहून कोल्हापूरकडे निघालेली एसटी बस (एम एच १४के क्यु ६८२६) व पाठीमागे मोटार (एमएच११ सी क्यु ८३६६) टोल भरण्यासाठी थांबली होती.

घुणकी : किणी (ता. हातकणंगले) येथील टोल नाक्यावर (Kini Toll Plaza) टोल भरण्यासाठी थांबलेल्या मोटारीला पाठीमागून कंटेनरने जोरदार धडक दिल्याने मोटार समोर असलेल्या एसटी बसला धडकली. यामध्ये कोणीही जखमी झाले नाही. हा अपघात काल सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास झाला. या घटनेची नोंद पेठ वडगाव पोलिस ठाण्यात (Peth Vadgaon Police Station) झाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com