
Crime News Kolhapur
esakal
ट्रक चोरी व अटक:
मार्केट यार्ड परिसरातून चोरीस गेलेला ट्रक सांगलीत भंगारात विकण्याचा प्रयत्न करताना पोलिसांनी दोन संशयितांना (सतीश चिखलकर व सयाजी चिखलकर, दोघे रा. चिखलकरवाडी, ता. पन्हाळा) अटक केली.
भंगार विक्रेत्याची भूमिका:
ट्रक विकण्याच्या प्रयत्नावेळी भंगार विक्रेत्याने कागदपत्रांची मागणी केल्याने चोरटे परतले. यावरून पोलिसांनी भंगार विक्रेत्यापर्यंत माग काढला आणि चोरट्यांचा मोबाईल क्रमांक मिळवला.
पोलिसांची कारवाई:
सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल क्रमांकाच्या आधारे तपास करून पोलिसांनी राजाराम तलाव परिसरातून चोरीचा ट्रक जप्त केला. कारवाईत शाहूपुरी पोलिस व विशेष पथकाचा सहभाग होता.
Stolen Truck Case Kolhapur : मार्केट यार्ड परिसरातील वाळू अड्डा परिसरातून चोरीस गेलेला ट्रक भंगारवाल्याला विकण्याचा प्रयत्न दोघांनी केला. भंगार विक्रेत्याने कागदपत्रांची विचारणा करताच दोघे परतले. पोलिसांनी भंगार विक्रेत्यापर्यंत माग काढला असता संशयित चोरट्यांचा मोबाईल क्रमांक मिळाला. पोलिसांनी मोबाईल क्रमांकाआधारे चोरट्यांना बेड्या ठोकत चोरीचा ट्रकही जप्त केला. सतीश श्रीपती चिखलकर (वय ३९) व सयाजी दिनकर चिखलकर (३२, दोघे रा. चिखलकरवाडी, ता. पन्हाळा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.