Fake Appointment letter : रेल्वेत बनावट नियुक्तिपत्र देणाऱ्या दोघांना अटक; नोकरी लावतो म्हणून ९ लाख रुपये घेतले
kolhapur Crime : रेल्वेमध्ये टीसी म्हणून नोकरीस लावतो, असे आमिष दाखवून वेळोवेळी पैसे घेतले. त्याला बनावट नियुक्तिपत्र देऊन याचे खोटे मेडिकल करून, खोटे ट्रेनिंग देऊन, रेल्वे खात्याचे बनावट नियुक्तिपत्र देऊन फसवणूक केली.
Two arrested for issuing fake railway job appointment letters and taking 9 lakhs from job seekers.Sakal
कोडोली : रेल्वे खात्यात टीसी म्हणून नोकरी लावतो, या कारणासाठी वेळोवेळी ऑनलाईन तसेच धनादेशाद्वारे ९ लाख रुपये घेऊन रेल्वेत टीसी पदावर नियुक्तीचे बनावट पत्र तसेच प्रशिक्षण देऊन फसवणूक केल्याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल झाला.