नागाव : संभापूर (ता. हातकणंगले) येथील एकाच कुटुंबातील दोन लहान सख्ख्या भावांचा मृत्यू झाला. वरद सागर पोवार (वय ६) आणि विराज सागर पोवार (४) अशी त्यांची नावे आहेत. चार दिवसांपूर्वी पोटदुखी आणि उलट्या सुरू झाल्याचे निमित्त झाले आणि ही दुर्घटना घडली. अन्नातून विषबाधा (Food Poisoning) झाली असल्याचा वैद्यकीय अधिकाऱ्यांचा प्राथमिक अंदाज आहे; पण मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदनाच्या अहवालानंतरच स्पष्ट होईल. एकाच घरातील दोन सख्ख्या भावांचा मृत्यू झाल्याने कुटुंबासह संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.