सख्ख्या चिमुकल्या बहिणींचा विहिरीत बुडून दुर्दैवी अंत; कागल परिसरात हळहळ, आई-वडिलांचा मन हेलावणारा आक्रोश

उसाला पाणी पाजून झाल्यानंतर आई (Mother) अश्विनी घरी गेल्या; मात्र आपल्या दोन्ही मुली घरी नसल्याचे समजले.
Kagal Crime News
Kagal Crime Newsesakal
Summary

आई-वडिलांनी केलेला आक्रोश मन हेलावून टाकणार होता. या घटनेने पिराचीवाडीसह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

म्हाकवे : पिराचीवाडी (ता. कागल) येथे दोन सख्ख्या चिमुकल्या बहिणींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. आरोही सुरेश भोसले (वय ९) आणि तिची धाकटी बहीण आराध्या (६) अशी त्यांची नावे आहेत. सकाळी आराध्या व आरोही यांना घेऊन आई शेतात उसाला पाणी पाजण्यासाठी गेल्या होत्या.

थोड्यावेळाने दोन्ही मुलींना घरी जाण्यास सांगितले. उसाला पाणी पाजून झाल्यानंतर आई (Mother) अश्विनी घरी गेल्या; मात्र आपल्या दोन्ही मुली घरी नसल्याचे समजले. बराच वेळ शोधाशोध केल्यानंतर मुली सापडल्या नाहीत. दरम्यान, विहिरीवर दोन्ही मुलींची चप्पलं दिसल्या.

त्यामुळे ग्रामस्थांनी विहिरीत उतरून शोध घेतला असता. त्यावेळी दोन्ही मुलींचे मृतदेह सापडले. वडील सुरेश भोसले हमालीचे काम करतात. आई-वडिलांनी केलेला आक्रोश मन हेलावून टाकणार होता. या घटनेने पिराचीवाडीसह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेची नोंद राधानगरी पोलिस (Radhanagari Police) ठाण्यात झाली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com