

एका घरात घुसून त्याने बेडखाली घेतलेला आश्रय, आवाजात दम नसलेली डरकाळी आणि एकूणच त्याचा वावर यामुळे तो पाळीव असल्याची चर्चा त्यावेळी होती.
esakal
Kolhapur Leopard : ‘बिबट्या आला रे, बिबट्या आला’ चा थरार आज नागाळा पार्क, ताराबाई पार्क परिसरातील लोकांनी अनुभवला. या घटनेत तीन तासांच्या प्रयत्नानंतर बिबट्याला जिवंत जेरबंद करण्यात यश आले असले, तरी यापूर्वीच्या दोन घटनांत शहरात आलेल्या बिबट्याचा मृत्यू झाला होता. आजच्या घटनेने १५-२० वर्षांपूर्वी घडलेल्या घटनांच्या आठवणींना उजाळा मिळाला.