Uday Samant I 'शिवसेनेच्या अस्तित्वाला कोणी हात घातला तर शिवसैनिक पेटून उठतील' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 uday samant

'उत्तरची विधानसभा पोटनिवडणूक शिवसेनेने लढवावी, ही शिवसैनिकांची भावना मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवू'

'सेनेच्या अस्तित्वाला कोणी हात घातला तर शिवसैनिक पेटून उठतील'

कोल्हापूर : कोल्हापूर उत्तरची विधानसभा पोटनिवडणूक शिवसेनेने लढवावी, ही शिवसैनिकांची भावना मुख्यमंत्र्यांपर्यंत (CM Thackeray) पोहोचवू. त्यासाठी दोन दिवसांत मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन निर्णय घेऊ, अशी ग्वाही उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी येथे दिली. शिवसेनेच्या अस्तित्वाला कोणी हात घालण्याचा प्रयत्न करेल तर शिवसैनिक पेटून उठेल, असा इशाराही त्यांनी दिला. शिवसेनेतर्फे झालेल्या पदाधिकारी व शिवसैनिकांच्या निर्धार मेळाव्यात ते बोलत होते. राजर्षी छत्रपती शाहू स्मारक भवन येथे त्याचे आयोजन केले होते.

सामंत म्हणाले, ‘‘गोकुळ निवडणुकीत (Gokul Election) सेनेला दुय्यम दर्जाची वागणूक मिळाली. आम्हाला महाविकास आघाडीचे घटक म्हणून वागणूक मिळायला हवी. कोल्हापूर उत्तर सेनेचा बालेकिल्ला असल्याने सेनेला (Shivsena) मान-सन्मान मिळाला पाहिजे. माजी आमदार आजी व्हावेत, यासाठी प्रयत्न करू.’’ संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर म्हणाले, ‘‘आदेशाचे पालन करणारे शिवसैनिक आहेत. शिक्का सेनेचा लक्षात ठेवायचा आहे. गाव तिथे शिवसैनिक हे आपले लक्ष्य आहे.’’

राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर म्हणाले, ‘‘पोटनिवडणुकीचा विचार करता सेनेचे मतदान काँग्रेसला होत नाहीत. महाआघाडीचे बळ वाढले पाहिजे, की कमी करायचे, याचा निर्णय घेण्याची वेळ आली आहे. पोटनिवडणूक सेनेने लढवली नाही तर साठ हजार मतदान नोटाला होईल.’’ माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर म्हणाले, ‘‘कोल्हापूर उत्तर पोट निवडणूक सामोरे जाताना गोची झाली आहे. आदेश काय येईल, याची कल्पना नाही. ही जागा सेनेची आहे. पाय पाठीमागे घ्यायला लावला तर भविष्य अंधकारमय होईल.’’ चंद्रदीप नरके म्हणाले, ‘‘पैसा व सत्तेच्या जोरावर काहीही करता येते, असा समज रुढ होत आहे. आमचाही वापर करुन सोडून देण्यात आले.’’ जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव म्हणाले, ‘‘कोल्हापूर उत्तर सेनेचा बालेकिल्ला आहे. निवडणूक लढवायची आहे.’’

हेही वाचा: तुमच्या गिधाड धमकीला आम्ही घाबरत नाही, सभागृहात शेलार संतापले

विजय देवणे म्हणाले, ‘‘सहकारात सेनेचा प्रवेश झाला आहे. पालकमंत्री व ग्रामविकासमंत्र्यांनी स्वतंत्रपणे जिल्हा परिषद व महापालिका स्वतंत्रपणे लढण्याची भूमिका घेतली आहे.’’
संजय पवार म्हणाले, ‘‘बारा वाजविण्याचे काम करायचे आहे. लोकांचे सेनेवर प्रेम आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत राजकारण लक्षात आले.’’ माजी आमदार उल्हास पाटील, सत्यजित पाटील-सरुडकर, रविकिरण इंगवले, विजय देवणे, मुरलीधर जाधव, सुजित चव्हाण, राहुल चव्हाण, मंजित माने, जयवंत हारुगले उपस्थित होते.

शिवसेनेचा महापौर होईल, असे काम करू

महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेचा महापौर होईल, असे काम केले जाईल, अशी ग्वाही श्री. सामंत यांनी दिली. पोटनिवडणुकीबाबत पालकमंत्र्यांचा मोबाईल कॉल आला होता, असे दुधवडकर यांनी भाषणात सांगितले. त्यांच्या पक्षनिष्ठेचे सामंत यांनी कौतुक केले.

हेही वाचा: 'पंतप्रधानांवर बोललं तर देशद्रोहाचा गुन्हा, मुख्यमंत्र्यांवरही कोणी बोलू नये'

Web Title: Uday Samant Says Touch Of Existence Shivsena Shivsainik Answer To Them In Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top