
Unchgaon DJ Noise Case
esakal
DJ Sound System Violations : उंचगाव (ता. करवीर) हद्दीतील सर्व सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांचे गणेशमूर्तींची विसर्जन मिरवणूक उचगाव कमान ते मंगेश्वर मंदिर या मेन रोडवर पार पडली. यावेळी ध्वनी मर्यादा उल्लंघन केलेल्या १८ डीजे मालकांवर, चालकांवर गांधीनगर पोलिसांत गुन्हा दाखल झाला. याची फिर्याद पोलिस हेडकॉन्स्टेबल सतीश दिलीप माने यांनी दिली.