

UPI MDR Rule
esakal
गडहिंग्लज : ग्राहक ते व्यापारी यांच्या दरम्यान दोन हजारांहून अधिक रुपयांच्या डिजिटल (यूपीआय) व्यवहारावर ०.४ टक्के शुल्क १५ आक्टोबरपासून आकारण्याचा निर्णय जाहीर झाला आहे. या पार्श्वभूमीवर घाऊक व्यापाऱ्यांनी पुढील महिन्यापासून रोखीने व्यवहार करणार असल्याचा निरोप समाजमाध्यमातून ग्राहक विक्रेत्यांना कळविला आहे. त्यामुळे किरकोळ विक्रेत्यांची चिंता वाढली आहे. ग्राहकाकडूनही यूपीआय रक्कम बंद करण्याविषयी विक्रेत्यांची मानसिकता होऊ लागली आहे.