

Abundant Water but Failing
sakal
कोल्हापूर : कुठे पाणी गळती, कुठे कमी दाबाने पुरवठा, कधी अचानक दुरुस्तीसाठी बंद, तर कधी यंत्रणा बंद पडल्याने खंडित अशा प्रकारांमुळे महापालिकेचा पाणीपुरवठ्याचा खेळखंडोबा झाला आहे. ज्या उपसा केंद्रातून पाणी उपसले जाते, त्यापैकी निम्म्याहून जास्त गळती चोरीतच जात असल्याची स्थिती आहे.