युरियाची रेल्वे कोल्हापुरात आली

पाच टनांचे लिंकिंग खत शेतकऱ्यांच्या माथी मारले जाणार असल्याची चर्चा
Urea
UreaSakal

कुडित्रे - खरिपासाठी आज ४८ डब्यांची, सुमारे तीन हजार टनाची युरिया खताची रेल्वे, रेल धक्क्यावर लागली आहे. शेतकऱ्यांना खत मिळणार असले, तरी या युरियाबरोबर तब्बल पाच टनांचे लिंकिंग खत आले आहे. आता हे सुमारे ६० लाखांचे लिंकिंग खत शेतकऱ्यांच्या माथी मारले जाणार असल्याची चर्चा आहे.

जिल्ह्यात चार लाख ४४ हजार हेक्टर शेतीचे क्षेत्र असून, सहा लाख ६० हजार शेतकरी आहेत. जिल्ह्यात मुख्य पीक ऊस घेतले जाते. आता भातपिकांसह जिल्ह्यात खरिपाचे तीन लाख ६३ हजार हेक्‍टर क्षेत्र यंदा आहे. यंदा डीएपी, युरिया, इफको खताची टंचाई होती.

पेरणी केल्यानंतर पावसाने ओढ दिली. शेतकरी अडचणीत आला आहे. पावसाला काही प्रमाणात सुरवात झाली असून, शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणावर युरियाची मागणी होत आहे. बायोला जैविक खते, मायक्रोला व मायक्रोला न्यूटेन्श खते दिली जाणार आहेत. हे लिंकिंग घेतल्यावरच कृषी सहायक दुकानदारांना व होलसेल दुकानदारांना युरिया खत मिळणार आहे, अशी माहिती एका दुकानदाराने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली. लिंकिंग कंपनीकडून दिले जाते. गेल्या महिन्यात शासनाची एक कंपनी १८:१८:१० खत देताना जर नॅनो एरिया लिंकिंग बरोबर देत असेल तर अशी कोणती यंत्रणा आहे की मधेच लिंकिंग करते, याची चौकशी होणे गरजेचे आहे.

कृषी विभाग व कंपनी या खतांना लिंकिंग खत म्हणत नाहीत. मात्र, लिंकिंगचे खत द्यावे, असा स्पष्ट संदेश दुकानदारांना पाठविला जातो. यात एखाद्या दुकानदाराने लिंकिंग नको म्हटले तर त्याला युरिया पोचविला जात नाही. मग हे लिंकिंग नव्हे तर काय आहे? कृषी विभाग व शासनाने यात गांभीर्याने लक्ष घालावे व शेतकरी, कृषी दुकानदारांना वाचवावे. एक्स भाडे, मार्जिन, लिंकिंग याबाबत संघटनेने मंत्रालयीन पातळीवर पत्रव्यवहार केला आहे.

- सागर खाडे, सचिव, जिल्हा संघटना (खते बी-बियाणे).

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com