
Elphant Latest Update : नांदणी येथील जैन मठात पूजनीय असलेल्या माधुरी हत्तीच्या स्थलांतरावरून निर्माण झालेल्या परिस्थितीवरून वनतारा संस्थेने अधिकृत निवेदन जारी केले आहे. कोल्हापूरकर आणि जैन समाजाच्या भावना समजून घेत वनताराने या निवेदनात स्पष्ट केले आहे की, त्यांचा सहभाग केवळ सर्वोच्च न्यायालय व मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशांपुरता मर्यादित आहे.
वनताराच्या निवेदनानुसार, माधुरीचे स्थलांतर करण्याचा निर्णय त्यांचा नव्हता, आणि त्यांनी कधीही अशा स्थलांतराची शिफारस केली नाही. संस्थेची भूमिका केवळ माधुरीची काळजी घेणे, तिला वैद्यकीय सेवा पुरवणे आणि तिच्या निवासाची योग्य व्यवस्था करणे यापुरतीच होती.