Kolhapur : वस्ताद बाळ गायकवाड यांचे निधन

कोल्हापूरच्या कुस्तीला एकीच्या धाग्यात बांधणारे, कुस्तीतील अभ्यासू वस्ताद, शहर व जिल्हा राष्ट्रीय तालीम संघाचे संस्थापक यशवंत ऊर्फ बाळ राजाराम गायकवाड (वय ९०) यांचे आज निधन झाले.
वस्ताद बाळ गायकवाड
वस्ताद बाळ गायकवाडsakal

कोल्हापूर : कोल्हापूरच्या कुस्तीला एकीच्या धाग्यात बांधणारे, कुस्तीतील अभ्यासू वस्ताद, शहर व जिल्हा राष्ट्रीय तालीम संघाचे संस्थापक यशवंत ऊर्फ बाळ राजाराम गायकवाड (वय ९०) यांचे आज निधन झाले. चार महिन्यांपासून ते आजारी होते. काल (ता. ५) अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात दाखल केले होते.

आज दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच कुस्ती क्षेत्रातून हळहळ व्यक्त झाली. त्यांच्या मागे दोन भाऊ, बहिणी, पुतणे, भाचे, सुना व नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन गुरुवारी (ता. ८) सकाळी आठ वाजता होणार आहे. बाळ गायकवाड ‘दादा’ या नावाने ओळखले जायचे. कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर ते पुनाळ येथे वास्तव्यास होते. गेल्या काही काळापासून त्यांची प्रकृती बिघडत होती.

काही महिन्यांपूर्वी त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. स्वस्थ वाटू लागल्यावर ते गावी परतले होते. मात्र, काल (ता. ५) त्यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. स्थिती चिंताजनक बनल्याने जिल्हा व शहर तालीम संघाच्या पदाधिकाऱ्यांनी रात्रीच रुग्णालयात हजेरी लावली होती. आज दुपारी त्यांचे निधन झाल्यानंतर पैलवानांनी रुग्णालयाकडे धाव घेतली. यावेळी त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या पैलवानांसह कुस्तीशौकिनांना अश्रू अनावर झाले होते. त्यांच्या निधनाचे वृत्त शहरात वाऱ्यासारखे पसरताच अनेकांनी विविध माध्यमांतून श्रद्धांजली वाहिली.

वस्ताद बाळ गायकवाड
Kolhapur : वादग्रस्त मदरशा इमारत मुस्लिम समाजानं उतरवली; 'लक्षतीर्थ'ला पोलिस छावणीचं स्वरूप, ठिकठिकाणी नाकाबंदी

कुस्तीसाठी आयुष्य वेचले

बाळ गायकवाड यांनी अविवाहित राहून सर्व आयुष्य कुस्तीला वाहिले. कुस्तीसाठी आयुष्य वेचलेला माणूस, अशी त्यांची प्रतिमा होती. शासनातर्फे जाहीर झालेले अनेक पुरस्कार व मानाची पदे त्यांनी स्वतःहून नाकारली होती. अनेक पैलवानांना कुस्तीचे मार्गदर्शनही ते करत असत. शेतीत ते वेगवेगळे प्रयोग करत होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com