Kolhapur Election : ‘वासुदेव आला हो… मतदान मागायला आला!’ कबनूरमध्ये संस्कृतीतून राजकारणाचा जागर

Vasudev Style Campaign : कबनूरमध्ये निवडणूक प्रचाराला एक वेगळाच सांस्कृतिक रंग चढला आहे. पहाटेच्या शांत वातावरणात टाळांचा नाद, भक्तीगीतांचा सूर आणि दारोदारी उभा असलेला वासुदेव या पारंपरिक शैलीतून एका सर्वसामान्य उमेदवाराने थेट मतदारांच्या मनाला हात घातला आहे.
A unique early-morning election campaign using the traditional Vasudev folk art in Kabnur.

A unique early-morning election campaign using the traditional Vasudev folk art in Kabnur.

sakal

Updated on

कबनूर : ‘वासुदेव आला हो वासुदेव आला.. सकाळच्या प्रहरी मतदान द्या हो बोलला..’ अशी पहाटे व सकाळी टाळच्या साथीने गोड सुरात आरोळी देत कबनूर जिल्हा परिषद मतदारसंघात प्रत्येकाच्या दारात वासुदेव उमेदवारासोबत उभा दिसत आहे. सकाळच्या प्रहरी घरचा दरवाजा उघडल्यानंतर या वासुदेवासोबत उमेदवार पाहून गृहिणी त्याला दाद देत आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com