Kolhapur News: 'सामना दुबईत, जल्लोष काेल्हापूरातील शिवाजी चौकात'; हातात तिरंगा घेऊन पाकिस्तानवरील विजयाचा आनंदोत्सव..

Triumphant Cheers in Kolhapur: शुभमन गिल आणि अभिषेक शर्मा यांनी धडाकेबाज फलंदाजी करून भारताला शंभरीपार नेले. त्यानंतर भारताचा विजय दृिष्टक्षेपात आला, तसा शहरातील विविध भागांत जल्लोष सुरू झाला. तिलक वर्माने एक षटकार आणि एक चौकार मारून विजय संपादित केला.
Kolhapur residents celebrate India’s cricket victory over Pakistan in Dubai, waving tricolor flags at Shivaji Chowk.

Kolhapur residents celebrate India’s cricket victory over Pakistan in Dubai, waving tricolor flags at Shivaji Chowk.

Sakal

Updated on

कोल्हापूर : पाकिस्तानने दिलेल्या लक्ष्याजवळ जसे भारतीय फलंदाज पोहाेचले, तसे येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात तरुणांची पावले वळली. दुचाकीचे सायलेन्सर आणि हॉर्न वाजवतच तरुणाई येथे पोहाेचली. हातात तिरंगा, भगवा ध्वज घेऊन तरुणाईचा जल्लोष सुरू झाला. आशियाई कपमधील सामना जरी दुबईत झाला असला तरी जल्लोष मात्र कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात जोरदार झाला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com