

शेतकरी संघटनांच्या आंदोलनाला यश ,‘बिद्री’ साखर कारखान्याचा उस दराबाबत 'यु टर्न' ३ हजार ६१४ पहिली उचल एकरकमी देणार
esakal
Kolhapur Sugarcane Protest : दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याने २०२५–२६ या गळीत हंगामासाठी प्रति टन ३ हजार ६१४ रुपये एकरकमी ऊसदर जाहीर केला. मागच्या काही दिवसांपूर्वी बिद्री सहकारी साखर कारखान्याने ३ हजार ४५२ दर जाहीर केला होता. हा निर्णय मागे घेत बिद्री साखर कारखान्याने ३ हजार ६१४ रूपये दर जाहीर केला. राज्यातील सर्वाधिक दर देणाऱ्या कारखान्यांच्या यादीत आपले स्थान अधिक भक्कम केले आहे. मुंबईहून थेट सहभागी झालेल्या कारखान्याचे चेअरमन माजी आमदार के. पी. पाटील यांनी पत्रकार परिषदेत ऊसदराची घोषणा केली. यावेळी व्हाईस चेअरमन मनोज फराकटे, संचालक मंडळ, व्यवस्थापकीय संचालक आर. डी. देसाई, कार्यकारी संचालक एस. एन. घोरपडे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.