कुरघोडीचे राजकारण ही भाजपची कार्यपद्धती नाही - चंद्रकांत पाटील | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Chandrakant Patil
"कुरघोडीचे राजकारण करणे भाजपची कार्यपद्धती नाही"

कुरघोडीचे राजकारण ही भाजपची कार्यपद्धती नाही - चंद्रकांत पाटील

कोल्हापूर :विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध व्हावी असा प्रस्ताव अद्याप आलेला नाही. प्रस्ताव येईल त्यावळी विचार करून निर्णय घेऊ. भाजप कोणालाही बिनविरोधचा प्रस्ताव देणार नाही. मात्र समोरून बरा प्रस्ताव आला तर नक्की विचार करू, असे स्पष्टीकरण भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज दिले. विधान परिषदेच्या सात जागांसाठी होणारी निवडणूक बिनविरोध करण्याची तयारी काँग्रेस आणि भाजपने सुरू केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती.

हेही वाचा: केजरीवालांचा बनवाट व्हिडीओ केला शेअर; संबित पात्रांवर कारवाईचे हायकोर्टाचे आदेश

याबाबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना विचारले असता ते म्हणाले, ‘‘काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राजू सातव यांच्या निधनाने राज्यसभेची एक जागा रिक्त झाली. या जागी भाजपने संजय उपाध्ये यांना उमेदवारी दिली; मात्र काँग्रेसच्या नेत्यांनी बिनविरोध निवडणूक व्हावी अशी विनंती केल्याने उपाध्ये यांनी अर्ज मागे घेऊन निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय पदाधिकाऱ्यांनी घेतला. काँग्रेसचे नेते शरद रणपिसे यांची विधान परिषदेची जागा रिक्त झाली होती. या जागी भाजपने संजय केणेकर यांना उमेदवारी दिली. मात्र या जागीही राजू सातव यांच्या पत्नी काँग्रेसकडून निवडणूक लढवणार आहेत. ही जागा बिनविरोध व्हावी म्हणूनही बाळासाहेब थोरात आणि नाना पटोले यांनी गळ घातली. महाराष्ट्रातील राजकीय संस्कृती विरोधाला विरोध करण्याची नाही. त्यामुळे भाजपचे केणेकर अर्ज माघार घेणार आहेत. मात्र या दोन जागांचा अपवाद वगळता अन्य कोणत्याही जागी निवडणूक बिनविरोध व्हावी असा प्रस्ताव भाजपकडे आलेला नाही. त्यामुळे बिनविरोध निवडणूक करण्याची कोणतीही चर्चा नाही.’’

हेही वाचा: ओवैसींनी सांगितलं शिवसेनेचं भविष्य; म्हणाले, '2024 साली शिवसेना नक्कीच...'

कोल्हापुरात विजय निश्‍चित

चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘‘कुरघोडीचे राजकारण करणे भाजपची कार्यपद्धती नाही. जर बिनविरोध निवडणुकीचा योग्य प्रस्ताव आला तर विचार करू. मात्र स्वतःहून कोणालाही बिनविरोध निवडणुकीचा प्रस्ताव देणार नाही. नागपूरमध्ये आमच्याकडे ९० मते विरोधकांपेक्षा जास्त आहेत. त्यामुळे आमचा विजय निश्चितच आहे. कोल्हापूरमध्येही विजयासाठी केवळ ४३ मते मिळवायची आहेत. त्यामुळे येथेही नक्की विजयी होऊन. मुंबई आणि मराठवाड्यातील जागीही आम्ही विजयी होणार हे आकडेवारीवरून दिसते. त्यामुळे निवडणूक बिनविरोध करण्याचा आमचा विचार नाही.’’

loading image
go to top