

कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयात धक्कादायक प्रकार
esakal
VIP Treatment Suspect : आपण काही गुन्हा केल्याची जाणीव गुन्हेगाराला होऊ न देण्यात काहींचा रस दिसून येतो. वैद्यकीय तपासणीच्या नावाखाली ‘बिर्याणी’, ‘नाश्ता’, ‘थंडपाणी’ असे चोचले पुरविण्याचे प्रकार सीपीआर आवारात दिसून येतात. पोलिस ठाण्याकडील संशयित असो किंवा कारागृहातून आणलेला कच्चा कैदी, त्यांची सगळी बडदास्त पुरवली जाते. रुग्णालयात आलेले रुग्ण, नातेवाइकांच्या डोळ्यांदेखतच घडणारे प्रकार घडताना सुरक्षेची जबाबदारी असलेली यंत्रणा ‘मूग गिळून गप्प का?’ असा प्रश्न उपस्थित होतो.