यामुळेच म्हणतात जगात भारी कोल्हापुरी ; 'या' गावात पाहुणा आल्यास होतोय दंड 

viral on social media notice for mhasave gram panchayat in kolhapur district
viral on social media notice for mhasave gram panchayat in kolhapur district
Updated on

कोल्हापूर - कोल्हापूर म्हटले की येथे जगापेक्षा वेगळे असे काहीतरी असते. त्यामुळेच जगात भारी कोल्हापुरी असे सहज म्हटले जाते. आताही अशीच एक घटना आहे, नक्कीच ती जगापेक्षा वेगळी आहे. सोशल मीडियावर तर या घटणेने धुमाकुळच घातला आहे. जिल्ह्यातील भूदरगड तालुक्यातील म्हसवे या ग्रामपंचायतीने काढलेली नोटीस सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. 

संपूर्ण जगासह आता खेडेगावातही कोरोनाची भीती पसरली आहे. कोरोनाचा प्रसार रोकण्यासाठी शासन जनजागृती करत आहे. त्याचप्रमाणे ग्रामपंचायतीही आपापल्या परीने ग्रामस्थांमध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहेत. म्हसवे ग्रामपंचायतीनेही अशी जनजागृती केली आहे. त्यासाठी त्यांनी एक खास नोटीस काढून लोकांना सावध केले आहे.  ग्रामपंचायतीच्या या नोटीसीची ग्रामस्थांनी तर दखल घेतली आहेच. शिवाय सोशल मीडियावर तर धम्माल केली आहे. ग्रामदेवतेच्या पुजेसाठी कुणीही जमू नका किंवा पाहुण्यालाही बोलावू नका, अशी नोटीस काढली आहे.  

अशी आहे ग्रामपंचायतीची नोटीस  

सर्व ग्रामस्थांना कळविण्यात येते की. उद्या दि.12 जून रोजी आपल्या म्हसवे  गावाची  मिरगी  म्हाई करण्यात येणार आहे. म्हाई ही घरातल्या घरात करावी. कोणीही  बाहेर गावातील पै पाहुणे बोलाऊ नये. कोणीही देवळात नैवेद्य दाखवायला जाऊ नये. सर्वानी घरातूनच नैवेद्य दाखवावा. वरील नियमांचे उल्लंघन केल्यास खालील प्रमाणे  दंडात्मक कारवाई करण्यात येईल. 

 नैवेद्य दाखवायला आल्यास 300/

घरी एक पाव्हणा दिसल्यास 300/

घरी  दोन पाव्हणे दिसल्यास 600/

दोन पेक्षा जास्त पाव्हणे दिसल्यास 1000/- रुपये 

 असे दंड आकारण्यात येतील. याची सर्व ग्रामस्थांनी दक्षता घ्यावी. 

वरील कामाची अंमलबजावणी करण्यासाठी  कोरोना स्वयंसेवक कमिटीतील 60 स्वयंसेवक कार्यरत असतील. 
या पैकी अंबाबाई देवालयात 5 जण. 
मरगुबाई देवालयात 5 जण
 आणि 50 स्वयंसेवक व ग्रामपंचायत कर्मचारी, पोलिस पाटील, ग्रामसेवक, सरपंच, तलाठी व कोतवाल, हे गावात येणाऱ्या पाहुण्यांच्याकडून सक्तीने  दंड वसूल करतील. 


हुकुमावरून 

कोरोना दक्षता समिती व ग्रामपंचायत म्हसवे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Kolhapur flood situation latest
Bay of Bengal Weather System Maharashtra Rain Alert
Panhala Police Act Swiftly After Huge Tree Falls Across Main Road
Kolhapur farmers oppose expressway project
Marathi News Esakal
www.esakal.com