

Viral Video Teacher Student
esakal
Viral Video Kolhapur Teacher : राज्यात मराठी शाळा वाचवण्यासाठी शासन विविध उपाययोजना करत असताना, दुर्गम भागात विद्यार्थ्यांची संख्या घटल्याने अनेक शाळांचे अस्तित्व धोक्यात आलं आहे. पण गगनबावड्यातील एका धनगरवाडा वस्तीतल्या प्राथमिक शाळेसाठी एक शिक्षक गेली तब्बल १२ वर्षे रोज जंगल पार करत पोहोचतो आणि फक्त दोन मुलींना भविष्यासाठी शिक्षण देतो आहे. 'त्या' शिक्षकाची ही अविरत धडपड आणि मुलींचा शिक्षणासाठीचा आत्मविश्वास दाखवणारा व्हिडिओ सध्या कोल्हापूरसह संपूर्ण महाराष्ट्रात व्हायरल होत आहे.