
हसन मुश्रीफांच्या मतदार संघातही मतदार यादीत घोळ, समरजितसिंह घाटगेंचा थेट आरोप
esakal
Kolhapur Political News : कागल नगरपरिषदेची सर्व प्रभागांची प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध झालेली आहे. यामध्ये ३४२ मतदारांची नावे गायब आहेत, तर ८२२ नावे दुबार व ४५८ मृत मतदार असून, ती नावे अद्याप वगळलेली नाहीत, तरी यासाठी जबाबदार असलेल्या मुख्याधिकारी व संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते व शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी आज येथे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. तसेच याबाबत न्याय न मिळाल्यास न्यायालयात जाऊ, असा इशाराही दिला.