शववाहिका मिळण्यासाठी वेटिंग ; अखेर मृतदेह नेला जीपमधून

waiting for death toll in the city rises during corona infection ambulance set up to transport the bodies
waiting for death toll in the city rises during corona infection ambulance set up to transport the bodies
Updated on

कोल्हापूर : ‘जगात भारी आम्ही कोल्हापुरी’ का म्हणतात याचे उत्तम उदाहरण नुकतेच आपटेनगर परिसरात पहावयास मिळाले. शहरात शववाहिका मिळण्यासाठी वेटिंग करावे लागत आहे. अशा वेळी हृदविकाराने मृत्यू झालेल्या वृद्धेचा मृतदेह नेण्यासाठी जीप मालक पुढे आला आणि सीट बाजूला काढून मृतदेह स्मशानभूमीपर्यंत नेला. सचिन जाधव यांनी माणुसकी काय असते, हे सुद्धा दाखवून दिले.


कोरोना संसर्गाच्या काळात शहरात मृत्यूचे प्रमाण वाढत असल्यामुळे मृतदेह नेण्यासाठी शववाहिका, रुग्णावाहिकेला सुद्धा वेटिंग करावे लागते. चार दिवसांपूर्वी आपटेनगर परिसरातील शांती उद्यान परिसरातील वृद्धेचा पहाटे साडेतीन वाजता हृदयविकाराने मृत्यू झाला.  मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नेण्यास शववाहिका, रुग्णवाहिकाही उपलब्ध झाली नाही. अनेकांनी यासाठी प्रयत्न केले.

सकाळी सात-साडेसात वाजेपर्यंत वाट पाहिली. सचिन जाधव तेथे आले. प्रवासी वाहतूक बंद असल्यामुळे त्यांची गाडी पाच महिने घरीच होती. त्याच्या कुटुंबाचा चरितार्थ चालवताना तारेवरची कसरत करावी लागत असताना, कामधंदा मिळत नाही, अशा वेळी काय करायचे म्हणून त्यांनी आपल्या गाडीतील सर्व सीट काढून भाजी विक्रीचा व्यवसाय सुरू केला आहे. मृतदेह नेण्यासाठी शववाहिका, रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याचे त्यांच्या लक्षात येताच त्यांनी जीपगाडीतून मृतदेह घेवून जाऊ, असे सांगितले. उपस्थितांनीही त्यांना प्रतिसाद दिला. अखेर जीपगाडीतून स्मशानभूमीकडे रवाना झाली. सचिन जाधव अडचणीच्या वेळी धाऊन आला.

असा प्रसंग कुणावर कधी येऊ नये, पण चुकून आलाच, तर दवाखान्यात नेण्यासाठी, मृतदेह नेण्यासाठी काही उपलब्ध झाले नाही तर अशा लोकांसाठी मी २४ तास उपलब्ध असेन. ही एक सेवा ईश्‍वर सेवा म्हणून मी काम करेन. प्रशासनाला सहकार्य करूया, त्यांना मदत करूया.
 सचिन जाधव, जीप मालक

संपादन - अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com