
Weapons Exhibition
esakal
शस्त्र प्रदर्शनाचे उद्घाटन – दसरा महोत्सवांतर्गत कोल्हापूरच्या दसरा चौक येथे शिवकालीन शस्त्रांचे तीन दिवसांचे प्रदर्शन खासदार शाहू महाराज यांच्या हस्ते सुरू झाले.
उद्दिष्ट – इतिहास नव्या पिढीकडे – तलवारी, ढाली, दांडपट्टा, तोफगोळे आदी शस्त्रास्त्रांचा ठेवा नागरिक व विद्यार्थ्यांनी पाहून प्रेरणा घ्यावी, असे आवाहन शाहू महाराजांनी केले.
संयुक्त आयोजन व सहकार्य – भारत सरकार, राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालय, जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने; शिवगर्जना-नाना सावंत यांच्या सहकार्याने हे प्रदर्शन आयोजित.
Historical Weapons Kolhapur : ‘इतिहासाचा समृद्ध वारसा शिवकालीन शस्त्र प्रदर्शनातून नव्या पिढीपर्यंत जाईल. हा सर्व ऐतिहासिक ठेवा असलेल्या शस्त्रांच्या प्रदर्शनाला अधिकाधिक नागरिक- विद्यार्थ्यांनी भेट द्यावी’, असे आवाहन खासदार शाहू महाराज यांनी केले.